बीड जिल्ह्यातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान गडाला गेल्या दोन वर्षात आनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. भगवान गड ही पवित्र भुमी संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे. साधारण 1940 च्या सुमारास नारायण गडाचा वाद सुरु झाले अनेक घडामोडी सुरु झाल्या त्यातुनच बाबांनी नारायण गडाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अंगावर असलेल्या कपड्या व्यतीरिक्त कोणतीही वस्तु किंवा संपती न घेता त्यांनी नारायण गडाचा जेंव्हा त्याग केला. तेंव्हा पुढे काय याचे कसलेही नियोजन नसतांना चालायला सुरुवात केली. खरवंडी ता.पाथर्डी येथील बाजीराव पाटील हे अत्यंत धार्मीक कुटूंब बाबांचे स्नेह होते त्यांना ही गोष्ट कळल्यावर बाबांची त्यांनी भेट घेतली. व त्यांना तेथेच थांबण्याची विनंती केली. काही दिवस थांबल्यानंतर खरवंडी जवळच एका उंच डोंगरावर बाबांनी थांबण्याचा निर्णय घेतला. ज्या डोंगराला धुम्या डोंगर नावाने ओळखले जाते. या ठिकाणी सुरुवातीला एक छोटेशे मंदीर होते. हळु हळु परिसर स्वच्छ होवु लागला. बाबा आता इथे थांबु शकतात. ही भक्तांना खात्री पटल्यास त्यांनी पुर्णपणे तेथे एक अध्यात्मीक केंद्र निर्माण करण्याचा संकल्प केला. व बाबांशी बोलल्यानंतर त्यांनी त्यास संमती दिली. आणि एका अभुतपुर्व अशा ऐतिहासिक भगवान गडाची कोणशिला निर्माण झाली. 1951 साली दसर्याच्या दिवशी शस्त्र पुजणांचा पहिला कार्यक्रम या डोंगरावर पार पडला. तेंव्हापासून आजपर्यंत दरवर्षी विजय दशमीला शस्त्र पुजन व सिमोलंगन करण्याची परंपरा सुरु झाली. ही परंपरा केवळ भक्तांच्या श्रद्धेतून सुरु झाली आहे. राजकीय वारसदारांच्या नाही हा विचार या निमित्ताने करण्याची वेळ आली आहे.
भगवान गड ही कोण एका जातीची, एका नेत्याची, एका पक्षाची अथवा कोणत्याही वारसदाराची खाजगी मालमत्ता नाही. तर आठरा पगड जातीच्या लोकांनी स्व: कष्टातून निर्माण केलेला तो सामाजिक व आध्यात्मिक भक्ती पिठाचा ठेवा आहे. सतत साथ वर्ष अथक परिश्रम करुन या डोंगरावर एक सुंदर दगडी बांधकाम करण्यात आलं त्याला मंदीराचा आकार देण्यात आला. मंदीर पुर्ण झाले.या मंदीरात मुर्ती आल्याशिवाय देवपण येणार नाही आणि म्हणून तत्कालीन विधान सभेचे अध्यक्ष व बाबांचे परम भक्त जेष्ठ गांधीवाधी नेते बाळासाहेब भार्दे, यांनी विठ्ठलाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी बाबाकडे परवानगी मागितली. यासाठी कोण येणार याची चर्चा झाल्यावर तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व राष्ट्रीय राजकारणातील सहयाद्री यशवंतराव चव्हाण यांना बोलवण्याचा व त्यांच्या हस्ते ही मुर्ती स्थापन करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला. 1958 ला लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी गडावर फक्त मुर्ती स्थापन केली नाही तर त्यांनी जाहीर केले. की आज पर्यंत धुम्या डोंगर म्हणून ओळखल्या जाणार्या या जागेला पुढे अनेक वर्ष , अनेक पिडया भगवानगड म्हणून ओळखतील तेंव्हा पासून हा परिसर तिर्थक्षेत्र भगवान गड म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यास यशस्वी झाला.
1965 ला पर्यंत दरवर्षी भगवान बाबांनी दसर्याच्या दिवशी शस्त्र पुजन व गावाच्या पायथ्या जवळील 25 गावातील लोकांना एकत्रीत करुन एक उत्सव सुरु केला. त्या उत्सवाचे रुपांतर म्हणजे आजचा दसरा मेळावा. बाबांच्या निधनानंतर त्यांच्या गाधीवर आलेल्या हरीभक्त परायण भिमसिंह बाबांनी ही परंपरा सतत 38 वर्ष अखंडपणे चालवली. परंतू भगवान बाबांच्या मुळ परंपरेत टप्या टप्याने बदल करत गेला. 1978 नंतर या भागात उस तोड कामगारांचे संघटन करणार्या व ती संघटना चालवणार्या माजी मंत्री बबनराव ढाकणे यांनी गडाच्या या उत्सवात लक्ष घातले. ऊसतोडायला जाण्यासाठी मजुरांची भरर्ती ही ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिण्यात असते. व याच दरम्यान हा मेळावा असल्याने कारखाल्याला जाण्यापुर्वी एक सामाजिक ऊत्सव करुन लोक कामासाठी जाण्याची परंपरा सुरु झाली. ही परंपरा पुढे चालु असतांना राज्याच्या राजकारणात व ऊसतोड कामगारात मोठ्या प्रमाणात सामाजिक व राजकीय बदल झाले परिणामी वेगवेगळे नेते व कार्यकर्ते जन्माला आले. 1992 ला लोकनेते गोपीनाथ राव मुंडे हे राज्याच्या राजकारणात विरोधी पक्ष नेते म्हणून चर्चेत आले. त्यांनी स्वत:च्या वकृत्वाने व नेतृत्वाने सामाजिक प्रभाव निर्माण करण्यास सुरुवात केली.वर्षानु वर्षे नेतृत्वासाठी चाचपणत असलेल्या ऊसतोडणार्या कामगारा त्यांचा रुपाने एक नेतृत्व भेटले. याचा परिणाम आपल्या आयुष्यात काही तरी बदल घडेल या भावनेतून ऊस तोडणार्या सर्व लोकांच्या दृष्टीने मुंडे साहेब हे नेते बनले. मात्र राजकीय दृष्टया लोकनेते मुंडे साहेबांना हा पुर्ण समाज एकत्रीत आण्यात यश येत नव्हते. अशा वेळी 1993 ला बीड शहरात घडलेल्या काही सामाजिक व राजकीय घटनामुळे भगवान सेना या सामाजिक संघटनेची निर्मिती झाली.
क्रमशः....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा