शनिवार, २९ जुलै, २०१७

अन्याय कि गद्दारी..भाग-2

स्व.मुंडे साहेबांनी आदेश दिला सर्व कार्यकर्ते आणि परळीकर खुश होते. धनुभाऊ हे तर पूर्ण ताकदीनिशी कामाला लागले होते रोज कमीत कमी 5 गावच्या लोकांच्या गाठीभेटी घेऊन अडीअडचणी सोडवल्या शिवाय घरी येत नव्हते. आणि घरी येऊन सुद्धा बाहेर गावावरून आलेल्या लोकांच्या अडचणी अगदी आमदार म्हणूनच सोडवत होते.
त्या वेळचा एक प्रसंग आठवला ज्या ठिकाणी सभा आहे त्या प्रत्येक सभेत सूत्रसंचलन करणारी व्यक्ती धनुभाऊच स्वागत 288 आमदारा पैकी सर्वात तरुण तडफदार अभ्यासू आमदार अश्या उल्लेखाने करत असे.
तर त्यावर धनुभाऊच उत्तर असायचं मी अजून आमदार झालो नाही पण 50 आमदारांची ताकद माझ्यात आहे..!
कदाचित नियती पुढं काय करील याची चुणूक लागली असेल त्यांना.
इकडे मतदारसंघात हा माणूस अगदी जिवाच रान करत रात्रीचा दिवस अन दिवसाची रात्र करून अगदीच तन, मन,धनाने सर्व जनतेसमोर जात होता आणि तिकडे मुंबईत परळीतिलच काही पांढरपेशी लोक ज्यांना फक्त साहेबांकडून आयते गबाळ हाणण्यात इंट्रेस होता असे पांढरपेशी लोक धनंजय मुंडे च्या विरोधात स्व मुंडे साहेबांचे कान भरवत होती पर्यायाने साहेबांच्या आदेशाची आणि धनंजय मुंडे च्या स्वप्नाची चिता तयार करत होती.
2009विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली होती सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले होते त्यात त्या बातम्या कानावर येऊन गेल्या होत्या पक्ष्याची पहिली यादी प्रसिद्ध झाली त्यात धनुभाऊ च नाव नव्हते तिथंच मनात संशयाची पाल चुकचुकली होती पण शेवट पर्यंत आपलं नाव येईल असं वाटत होत. अंतिम यादिला अवघे 2 दिवस उरले होते यादी प्रसिद्ध झाली आणि परळी चा उमेदवार धनंजय मुंडे नसून पंकजा ताई आहेत हे कळलं त्यावेळी कोणालाही ऐनवेळी नाव बदलण्यात आलंय हा विश्वासच बसत नव्हता कारण की ना कुठली मागणी न चर्चा न काम म्हणून जो तो म्हणत होता हि फेक न्यूज आहे पण तीच खरी न्यूज होती...! काही मोजक्या पांढरपेशी लोकांच्या म्हणण्यावरून धनंजयमुंडे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती...!
लगेचच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी व तेव्हा चे (युवा मोर्च्या प्रमुख)निळूभाऊ नि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्व.मुंडे साहेब स्व.पंडित आंण्णा आणि खुद्द धनंजय_मुंडे यांच्या भागवत मंगल कार्यालय येथे बैठकीचे आयोजन केलं होतं त्यात सर्वांनी एकमुखाने स्व.मुंडे साहेबांना उमेदवारीचा फेरविचार करून धनंजय मुंडे यांना उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणी केली होती पण ती सर्व कार्यकर्त्यांची मागणी सुद्धा त्यावेळी कामाला आली नाही..!
विषय तो नव्हताच की ताईंना उमेदवारी का दिली..!
विषय होता तो 6 महिन्याने आधी आदेश देऊन आशेला लावून धनंजय मुंडे ना मतदारसंघ पिंजून काढायला लावायला नाही पाहिजे होता आणी धनंजय मुंडे हे लोकांसमोर आमदार म्हणूनच गेलेले होते तर तो त्यांचा जनतेत किती मोठा अपमान होता हस झालं होतं जिकड तिकडं सर्वांचेच...! धनंजय_मुंडे ची आशामोड झाली होती.!
सर्व कार्यकर्ते नाराज निराश झालेले असताना त्यांच्यात नवा जोश भरून त्यांना नाही नाही तसल्या शपथा घालून हि निवडणूक जर आपण काही भलं बुर कराल तर त्याचा शिक्का आयुष्यभर माझ्या कपाळी बसेल म्हणून सर्व कार्यकर्त्याना कामाला लावले..!
एवढं सगळं होऊनही एवढी निराशा आशामोड अपमान होऊनही कसलीही निराशा नाराजी न दाखवता धनंजय नावाच्या वाघान पंकजा ताई च्या निवडणुकीची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन ताईचा विजय सुकर केला आणि 36000 हजारांनी ताईचा विजय झाला..!

- नंदकिशोर मुंडे ( संग्रहित लेख ) 

अन्याय कि गद्दारी..भाग-1

2009 च्या उन्हाळ्यात स्व. मुंडे साहेबांची संघर्षयात्रा परळीत येणार होती माझ्यासारखे नवखे आणि जुने सवंगडी घेऊन धनुभाऊ संघर्ष यात्रेच्या सभेची तयारी 4 दिवसा पासून करत होते..
साहेबांना स्टेज असं लागत रे, साहेबानां उघड्या टफाच्या व्हँन मध्ये थर्मल पासून आपल्याला वाजत गाजत आणायचं रे, साहेबांना भरजरी फेटा असा घ्या रे , 5000 पोर घेऊन गाड्यांची रॅली आपल्याला परळी च्या हद्दी पासून काढायची आहे ते कुठले कुठले ते अश्या खूप छोट्या छोट्या गोष्टी वर लक्ष देऊन हा माणूस 4 दिवस बरोबर झोपला सुद्धा नव्हता... जणू परळीत वारकऱ्यांचा विठ्ठलच येणार असं धनुभाऊ च्या मेहनती तुन दिसत होतं काय ते प्रेम किती असावं साहेबांवर धनुभाउंच जणू आपला प्रियकर पहिल्यांदा प्रेयसी ला भेटायला येणार आणि त्या प्रेयसी ची जी तळमळ होते अगदी तशीच तळमळ होती.
तो दिवस उजाडला सकाळी इटके कॉर्नर मा. निळूभाऊ चाटे यांच्या नेत्रत्वाखाली गाड्यांची रॅली होती त्यांनी सर्व व्यवस्था करून ठेवली होती धनुभाऊ आले आणि 5000 पोरांची रॅली गँगखेड परळी हद्दीपर्यंत जाऊन पोहचली...... साहेब येणार म्हणून सर्व तरुणांमध्ये जोश होता साहेब संध्याकाळी 5 ला आले त्यांच्यासोबत गाडीत मा. एकनाथ खडसे मा.पांडुरंग पुंडकर हे होते पुढं गाड्यांची रॅली घोषणा साहेबांचा जयघोष एकदम पुढच्या गाडीवर धनुभाऊ हे होतो सर्व परिसर साहेब मय झाला होता...
साहेबांची रॅली सभेच्या ठिकाणी पोहोचली
(तोतला मैदान) सर्व मान्यवर व्यासपीठा वर विराजमान झाले मान्यवर सरकार वर आसूड ओढत होते आपल्या भाषण शैली तून सरकारचा समाचार घेत होते पण माझ्या सहीत सर्व सभेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या परळीकरांना उत्सुकता होती ती साहेब कधी बोलतील आणि कधी आम्हाला आमच्या नेत्याला आदेश देतील...होय..आदेश कारण की 6 महिन्यावर विधानसभा होती साहेब भाषणाला उठले आपल्या स्टाईल मध्ये नाकाला अंगठ्याने झटका दिला आणि माईक खाली सरकवला बोलायला सुरुवात केली त्यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला शेतकऱ्यांची व्यथा आपल्या भाषणात मांडली आणि ती वेळ आली आम्ही ज्याची वाट पाहत होतो साहेबांनी स्टेजवरच कोपऱ्यात उभ्या असलेल्या धनुभाऊ कडे पाहिलं आणि म्हणले धनंजय खूप छान नियोजन केलंस सभेचे.... एवढे युवक इतके लोक शिस्तबद्ध नियोजन केलंस आता माझ्या जागी यायला तू समर्थ झालास "धनंजय विधानसभेच्या तयारीला लाग पुढचा परळीचा आमदार तूच आहेस"...प्रचंड टाळ्या शिट्ट्या..
(या घटने चा साक्षीदार मी व सर्व परळी कर आहेत).

क्रमश... 

शरद पवार : महाराष्ट्राचा अर्धशतकाचा इतिहास..भाग-2

साहित्यिक, लेखक, विविध विषयांतील तज्ज्ञ यांच्यासोबत ते नेहमीच वावरताना दिसतात. मी राज्याचा शिक्षणमंत्री असताना मला त्यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत होते. शिक्षण क्षेत्रात काय नवीन केले पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असे, त्यासाठी ते आमच्यासोबत अनेक बैठकी घ्यायचे. गोविंदभाई श्रॉफांसारखे आंदोलक, अनंत भालेरावांसारखे कठोर पण चोखंदळ टीकाकार, बापू काळदात्यांसारखे समाजवादी नेते यांनाही ते सदैव आपले वाटले. हमीद दलवाईसारख्या क्रांतिकारी कार्यकर्त्याला त्याच्या अखेरच्या काळात आपल्या घरी आश्रय देऊनही महाराष्ट्रातील अल्पसंख्य समाजाशी पवारांना आत्मीयतेचे संबंध राखता आले.
नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्याशी त्यांना एकाचवेळी मैत्र राखता येते, बाळासाहेब ठाकरे आणि फारुख अब्दुल्ला ही त्यांच्या परिवारातली माणसे असतात. इंदिराजी, राजीवजी, नरसिंहराव आणि डॉ.मनमोहनसिंग यांच्या सत्ताकाळात पवार त्यांचे सहकारी राहिले. मात्र त्यांना मिळालेला बहुमान त्यांच्या सत्तापदाचा नाही, त्यांना मिळालेल्या पद्मविभूषण या किताबाचाही नाही, तो त्यांना मिळालेल्या लोकमान्यतेचा आहे. साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा अशी सगळी क्षेत्रे नुसती व्यापण्याचाच नव्हे तर प्रसंगी मार्गदर्शन करण्याचा अधिकारही त्यांना प्राप्त आहे.
लो. टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद अमृत डांगे, एसेम जोशी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पश्चात महाराष्ट्राला लाभलेला सर्वात मोठ्या उंचीचा व प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचा हा नेता त्यांच्या राजकीय आयुष्याचे अर्धशतक पूर्ण करतो तेव्हा तो केवळ महाराष्ट्राचा नेता, मुख्यमंत्री वा मार्गदर्शकच राहत नाही, तो त्याच्या अर्धशतकाच्या इतिहासाचा निर्माताही झालेला असतो.

- राजेंद्र दर्डा (लोकमत एडिटर इन चीफ) 

शरद पवार : महाराष्ट्राचा अर्धशतकाचा इतिहास..भाग-1

अविचल मूल्यनिष्ठा व व्यावहारिक लवचिकता, वैचारिक दुरावा व व्यक्तिगत ममत्व, सत्तायोग व सेवाधर्म यासोबतच प्रादेशिकता व राष्ट्रीयत्व या वैशिष्ट्यांवर हक्क सांगणारा शरद पवाराजींएवढा उंचीचा व मान्यतेचा दुसरा नेता आज महाराष्ट्रात नाही. लोकप्रियता आणि लोकक्षोभ यातून सुखावून आणि सलाखून निघालेला तसा सर्वमान्य पुढारीही महाराष्ट्रात  कोणी नाही.
शेतकरी कामगार पक्षाच्या डाव्या वैचारिक परंपरेचा कुटुंबातून मिळालेला वारसा, यशवंतराव चव्हाणांसारख्या प्रगल्भ मार्गदर्शकाचा राजकीय संस्कार, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा मनोमन केलेला अंगीकार आणि राजकारणातील केवढ्याही मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्याची आणि त्यातली कोणतीही जबाबदारी समर्थपणे पेलून धरण्याची क्षमता जपणाºया शरद पवारांना स्वपक्षाएवढीच विपक्षातही मान्यता आहे.
५० वर्षांच्या राजकीय व वैधानिक आयुष्यात त्यांच्या वाट्याला अनेक मोठी व महत्त्वाची पदे आली. देवदुर्लभ सन्मान आले, कोणत्याही मान्यताप्राप्त पुढाºयाच्या वाट्याला येऊ नये अशी टीकाही आली. पण प्रशंसेच्या हारांनी ते कधी भारावले नाहीत आणि टीकेच्या प्रहारांनीही ते कधी डगमगले नाहीत. आयुष्य आणि अनुभव, काळ आणि त्यासोबत बदलत जाणारे समाजाचे प्रश्न या साºयांकडे कमालीच्या विधायक दृष्टीने पाहत त्यांनी राज्याचे व समाजाचे नेतृत्व केले.
युवक काँग्रेसचे जिल्हा पातळीवर नेतृत्व करीत असतानाच आपल्या क्षेत्रातील सव्वाशेहून अधिक खेड्यांना सिंचनक्षमता प्राप्त करून देणारा हा तरुण नेता साºया महाराष्ट्राची तशीच सेवा करताना आयुष्यभर आढळला.
चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर १९९४ साली मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे केले. त्यासाठी १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना व त्यांच्या पक्षाला त्याची किंमतही मोजावी लागली. पण, सामाजिकदृष्ट्या पवार साहेबांनी आपल्या धोरणाशी प्रामाणिक राहून नामांतराचा विषय मार्गी लावला. सभोवती मृत्यूचे थैमान असताना शेकडो प्रेतांच्या मध्यभागी सारे प्रदूषण अनुभवतच त्यांनी लातूरच्या भूकंपग्रस्तांना दिलासा दिला. आपल्या मनाचा थांग लागू न देता समोरच्याला आपलेसे करून घेण्याची त्यांची वृत्ती अनुकरणीय आहे. सोबतच्या विश्वासू माणसांना जपत असतानाच आपल्या विश्वासाला धक्का लावणाºया माणसांना खड्यासारखे दूर करण्याची त्यांची तटस्थताही विलक्षण आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या चार कारकिर्दी यशस्वी करणाºया पवारांनी केंद्रातील संरक्षण व कृषी ही दोन्ही महत्त्वाची व संवेदनशील खाती राबविली. लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेतेपदही त्यांनी समर्थपणे अनुभवले. काँग्रेस या मातृपक्षापासून वेगळे होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला व तो एकहाती वाढवून राज्यव्यापी केला. ते करताना आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी बळ व साधने पुरविली आणि प्रसंगी ते त्यांच्या मागे सर्वशक्तिनिशी उभे राहिले. हे राजकारण करीत असतानाच महाराष्ट्राच्या विकासावरील त्यांचे लक्ष कधी विचलित झाले नाही. येथील सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, ग्रामीण भागातील लघुउद्योग आणि सुखसोई याबाबतचा त्यांचा आग्रह पूर्वीएवढाच आजही कायम आहे. शेतकºयांच्या उत्पादनाला न्याय्य भाव मिळावा आणि ग्रामीण भागातील माणूस समाजाच्या इतर वर्गांसोबत बरोबरीच्या नात्याने उभा राहावा हे त्यांचे स्वप्नही त्यांनी कधी नजरेआड होऊ दिले नाही. मुंबईपासून गडचिरोलीपर्यंतच्या प्रत्येकच क्षेत्राची गरज समजून घेऊन ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारे पवारांचे नेतृत्व महाराष्ट्रासाठी वरदान ठरले आहे. त्यांच्याशी अनेकांनी वैर केले, त्यांना जिव्हारी लागेल अशी टीकाही त्यांच्यावर केली, अविश्वसनीयतेपासून साºयांना संभ्रमात ठेवणारा नेता अशी टीकाही त्यांनी अनुभवली. मात्र विकासावर लक्ष केंद्रित केलेल्या या नेत्याचा संयम त्यातल्या कशानेही ढळलेला कुणाला दिसला नाही.
पवारांनी मराठवाड्यासाठी केलेले काम या प्रदेशाला समृद्धी व संपन्नतेएवढेच सामाजिक स्वास्थ्य देऊन गेले आहे. येथील अनेक वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये त्यांच्याच प्रयत्न व प्रेरणांनी येथे उभी राहिली. शिक्षण व संस्कृतीची आज जी विविध दालने येथे खुली झाली त्यांचेही श्रेय खºया अर्थाने पवारांकडेच जाणारे आहे. औरंगाबाद-वाळुज ही महत्त्वपूर्ण औद्योगिक वसाहत त्यांच्याच प्रयत्नांतून उभी राहिली. मला आठवतं, त्यावेळी राज्याचे उद्योगमंत्री होते माझे वडील जवाहरलालजी दर्डा. पवारसाहेब साहेबांएवढा प्रचंड मेहनत घेणारा दुसरा कुणी राजकारणी महाराष्ट्रात आहे असं मला वाटत नाही.

क्रमश.... 

शुक्रवार, २८ जुलै, २०१७

"चाल दोस्ता तुला "मराठवाडा" दाखवतो "



मराठवाड्यातल्या शेतकर्यावर सततची निसर्गाची होणारी अवकृपा व त्यातुन निर्माण होणारे
भयाण वास्तव याचं विवेचन करणारी एका लेखकाची सत्यकविता... 


चाल दोस्ता तुला "मराठवाडा" दाखवतो..
काळ्या आईच्या पोटात खुडलेला कोवळा गर्भ दाखवतो,
चाल दोस्ता तुला "मराठवाडा" दाखवतो..

कोरडा डोळा , कोरडी विहीर,
कोरड्या राजकारण्यांचे ,कोरडे संदर्भ दाखवतो,
चाल दोस्ता तुला "मराठवाडा" दाखवतो..

वावरात शेतकऱ्याची सत्ता नाही,
विहिरीत पाण्याचा पत्ता नाही,
पाच वर्षा पासुन, कनेक्शन साठी केलेला अर्ज दाखवतो,
चाल दोस्ता तुला "मराठवाडा" दाखवतो..

या वर्षी वावरात, पिकांची शाळाच नाही डवरली,
कि निसर्गानं वावराची, फी च नाही भरली,
अनुपस्थित पिकांचा, सुनसान वर्ग दाखवतो,
चाल दोस्ता तुला "मराठवाडा" दाखवतो..

बिजवाई घेतली तं,खताची असते उधारी,
पोराला शिकोलं तं ,पोरगी राह्यते कोरी,
दुःखाचा तं उकळा रोज ,सुख वर्ज्य दाखवतो,
चाल दोस्ता तुला "मराठवाडा" दाखवतो..

असे उसने आयुष्य जगण्याचा, फायदा तरी काय,
एंड्रिन च्या दुकानाकडे , आपोआप वळतात मग पाय,
जहर खाण्यासाठीही ,काढलेलं कर्ज दाखवतो,
चाल दोस्ता तुला "मराठवाडा" दाखवतो..

योजना नको सांत्वन नको ,नकोच करू हाऊस,
देवा तू फक्त वेळेवर, पाडत जा पाऊस,
माझ्या डोळ्यात लपवलेला मग, निसर्ग दाखवतो,
चाल दोस्ता तुला "मराठवाडा" दाखवतो...

-संग्रहीत कविता (लेखकाचे नाव आजतागायत कळालेलं नाही) 

शुक्रवार, २१ जुलै, २०१७

बालाघाटच्या डोंगर रांगेतील उगवता सूर्य



               बालाघाट म्हंटल कि आठवतो तो संघर्षशील लोकांचा मराठवाडा मागच्या दोन ते तीन वर्षात बालाघाट डोंगरी पट्यात राहणाऱ्या लोंकाना जास्तीचाच संघर्ष करावा लागलाय कारण सततचा दुष्काळ आणि नापिकी त्यामुळे येथील लोकांना जगन कठीन बनलं पण त्या दुष्काळ परिस्थिती मध्ये बालाघाटच्या डोंगर रांगातून उगवला एक सूर्य आणि आशेचा किरण ते म्हणजे धनंजय मुंडे साहेब, साहेबांच्या रूपाने आणि शेतकऱ्यांना कुठे तरी वाटायला लागलं की आपल्याला हा माणूस न्याय मिळवून  देऊ शकतो 
निसर्गाने जरी या भागाशी भेदभाव केलेला असला तरी साहेबांच्या रूपाने एक बदल घडवून इच्छिणारे मसिहा आपणास पाहावयास मिळत आहे येथील परिस्थितीवर मांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या फोल असणाऱ्या समीकरनाना तोडीस जबाब देणारा विरोधक म्हणजे ना धनंजय मुंडे हे नाव दुष्काळी परिस्थिती जनावरानच्या चाऱ्याचे होणारे हाल पाहून त्यांच्या चाऱ्याची सोय करणाऱ्या छावणी पुरुषास दाद द्यायला हवी. .
त्यांनी चारा छावण्या पुन्हा सुरु कराव्यात या प्रश्न बदल सभागृहात आवाज उठवला आणि आक्रमक पवित्रा घेतला आणि आज त्यांच्या मुळे गुरे व जनावरे जगतायत या वरून त्यांच प्राणिमात्रावरच विलक्षणीय प्रेम दिसून येत 
दुष्काळ प्रवन क्षेत्रात सत्ताधारी फक्त ए सी गाडीत बसून दोरे करत होते पण ते फक्त ओपचारिकता पूर्ण करत होते
पण धनंजय मुंडे हे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस च्या उन्हात शेतकऱ्याच्या बाधावर बसून बळीराज्याच्या परिस्थितीचा आढावा घेत राहिले आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम ते करत होते आणि वरील कामांची पोच पावती त्यांना जनतेनी आताच झालेल्या निवडणुका जि प व पंचायत समितीच्या मधे जनतेनी त्यांना डोक्यावर घेतलं आणि सर्वाधिक मताधिक्य राष्ट्वादि पार्टीला मिळाले  व मुंडे यांच्यावरील प्रेम मतांद्वारे दाखवून दिल सध्याच्या परळी मतदार संघातील सतेतील नेत्रत्वाल मोठा फटका त्यांनी दिला आणि धनंजय मुंडे हे या मतदार संघाचे खरे विकासाभिमुख आहेत बहे मताद्वारे दाखून दिले 
एकापेक्षा एक सरस कामांमुळे मुंडे यांच नेत्रत्व आता बीड जिल्ह्या पुरत राहील नसून व मराठवाड्या पुरत नसून या नेत्रवत्वाची व्याप्ती आख्या महाराष्ट्र् भर विस्तारित होत आहे 
नेत्रत्वाच्या विस्तरामुळे ओ बी सी चा महाराष्ट्रातील नवा चेहरा म्हणून मुंडे यांच्या कडे पाहिलं जात आहे पण मुंडे यांचा लढा फक्त ओ बी सी जनते पुरता नाही मुंडे यांचा लढा हा पुर्न जाती पातीन साठी आहे हे त्यांनी मराठा आरक्षण बदल सभागृहात आपला आवाज उंचावून पूर्ण महाराष्ट्राला त्यांनी दाखून दिल 
मंग ते धनगर समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल यांच्या आरशनाबदल व न्याया बदल मुंडे यांचा अविरत संघर्ष चालूच आहे. जो पर्यंत महाराष्ट्रातील समाजाना योग्य दिश्या व योग्य सन्मान मिळत नाही तो पर्यंत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्या शिवाय राहणार नाहीत यात शंका नाही..! 

- शाम के गित्ते ( संग्रहित लेख) 

मंगळवार, १८ जुलै, २०१७

सर्वसामान्यांशी नाळ जोडलेलं नेतृत्व

                     धनंजय मुंडे.. साधारण 10-15 वर्षांपूर्वी हे नाव महाराष्ट्रात उच्चरल्यावर लोकांमध्ये हा आमुक आमुक मोठ्या नेत्याचा पुतण्या बस एवढीच ओळख होती, ह्या उदयोन्मुख नेत्याला खरी ओळख भेटायला सुरुवात झाली 2012 सालीच्या बंडामुळे, महाराष्ट्रात जवळपास 40 वर्ष एक प्रकारे राजकारण गाजवून सोडणाऱ्या आणि प्रस्थापित असलेल्या गोपीनाथ मुंडें साहेबांविरोधात बंड करणे म्हणजे खूप मोठी घटना त्यावेळी मानली गेली , पण म्हणतात ना बंड करणे खूप सोप्पे पण ते यशस्वी करून दाखवणे खूप अवघड..!
                      2012 सालापासून आज पर्यंतची या उदयोन्मुख नेतृत्वाची वाटचाल म्हणजे ते बंड एकप्रकारे यशस्वीच होय, 2012 साली गोपीनाथ मुंडे साहेबांची साथ सोडल्यानंतर ह्या पोराचे काय खरे आहे , काकाच्या जीवावर आजपर्यंत चालले होते , ह्याचे राजकारण संपल्यात जमा इत्यादी, अगदी आह से लेकरं आह तक बऱ्याच चर्चा गावागावातील चावडीवर झाल्या , आणि याची सुरुवात झालीसुद्धा अशीच काही, महिन्याच्या अंतराने झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विरोधकांनी भावनेच्या आधाराने धनंजय मुंडेंना संबंध लोकांमध्ये एकप्रकारे खलनायक ठरवले, याचा परिणाम म्हणजे धनंजय मुंडेंना नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेत पूर्ण पणे पराभवाचा सामना करावा लागला , स्वतः पंडित अण्णा मुंडे यांना सुद्धा पराभव पाहावा लागला.
                     एखाद्या खलास्याने पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यासाठी आपली जहाज तयार करणे आणि ती तिच्या पहिल्याच सफरी मध्ये बुडणे असाच काहीसा प्रकार धनंजय मुंडेंच्या बंडाच्या बाबतीतही त्यावेळी झाला, अपुरा वेळ , संघटन बांधणीचा अभाव ह्याचा फटका धनंजय मुंडेंना त्यावेळी बसला ,पण खचून जातील ते धनंजय मुंडे कसले , लागलीच त्यांनी आपला स्वतःचा रस्ता स्वतः बनवायला सुरुवात केली, पक्षाचे मेळावे घेणे , गावोगावी जाऊन लोकांना सत्यपरिस्थीती सांगून मतपरिवर्तन करणे , आणि कार्यकर्त्यांची एक विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसवून एक नवीन सुरुवात करणे, ह्याचा एकत्रीत परिणाम 6 महिन्यांनी झालेल्या ग्रामपंचायात निवडणुकीत दिसून आला, ज्या परळी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये भाजप सोडून कोणताच पक्ष निवडून येऊ शकत नाही हा जर इतिहास असेल आणि धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी म्हणून जन्मगाव नाथरासाहित तालुक्यातील 80 टक्के ग्रामपंचायती जिंकून त्यावेळी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली..
                          लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला हमखास 50 हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देणाऱ्या परळी मतदारसंघाचे लीड सुद्धा 30 हजारांनी घटवून दाखविलं, 3 वर्षांपूर्वी च्या विधानसभा निवडणुकीत सत्तेबाबत असलेली एकूणच अँटी इंकंबन्सी , सत्ता बदल करण्याचा असलेलं एकूणच जनमानस , मोदी लाट , मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली सहानुभूती असूनही धनंजय मुंडेंना विधानसभा जिंकण्यासाठी 15 ते 20 हजार मते कमी पडली, म्हणतात ना सूर्य कधी तळ हाताने झाकत नाही तसंच काहीसे धनंजय मुंडेंच्या बाबतीत झालं , विधानसभा निवडणुकीत पराभव होऊन देखील धनंजय मुंडेंवर विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी पवार साहेबांसारख्या जोहरीने टाकली, विरोधी पक्षनेते पद मिळाल्यापासून धनंजय मुंडें मध्ये एकप्रकारे वेगळाच उत्साह संचारला गेला, आपली आक्रमक वक्तृत्वशैली , सत्ताधाऱ्यांवर तुटून पडायची हातोटी , भारदस्त शरिरयष्टी ,आणि त्या जोडीला राजकारणी आवाज ह्यामुळे भल्या भल्या मंत्र्यांना मुंडेंचा धाक वाटायला लागला, चिक्की घोटाळा प्रकरण असो कि बोगस डिग्री असो , कोपरडी येथील बलात्काराची घटना असो की शेतकऱ्यांची अडचण ,मुंडेंनी सरकारला असे काही अडचणीत आनले कि बस्स....!
                              सभागृहात त्यांचे भाषण सुरु झाले की सत्तेतील काही मंत्री सभागृहात येण्यास धजावतात इतकं स्पष्ट आणि पुराव्यासाहित ते एखाद्या प्रकरणाची चिरफाड करतात, आपले एखादे काम धनंजय मुंडेंकडे घेऊन गेल्यास ते या सरकारला वाकवू शकतात हि खात्री सर्वसामान्य जनतेला पटू लागली आणि मुंडेंच्या कार्यालयात ह्या जुलमी राज्य सरकार विरोधात गाऱ्हाणी मांडायला लोक येऊ लागली ,मुंडेंही त्या सर्वांच्या समस्या जातीने समजावून घेऊन स्वतःची समस्या असल्यासारखे त्यात लक्ष घालतात आणि ती मार्गी लावतात, अशाप्रकारे हे नेतृत्व हळू हळू संबंध महाराष्ट्रच्या जनतेच्या संपर्कात जात आहे , मुंडेंची खासियत म्हणजे त्यांचे वक्तृत्व होय, एखाद्या दगडाला देखील पाझर फुटेल इतके त्यांचे वक्तृत्व प्रभावशाली , कुठलीही निवडणूक असली की पक्षाचे उमेदवार आम्हाला धनंजय मुंडेंची सभा द्या असा आग्रह करतात आणि मुंडे त्यांच्या मदतीसाठी जातातही , कुठलाही नेत्याला राज्याचे नेतृत्व करत असताना स्वतःच मतदारसंघ सांभाळायची तारेवरची कसरत करावी लागते , त्यातही मुंडे तरबेज निघाले ह्याचा पुरावा म्हणजे मागच्या 8 महिन्यातील परळी मधील 4 निवडणूका होय , नगरपालिका असो की पंचायत समिती , किंवा जिल्हा परिषद असो की बाजार समिती धनंजय मुंडेंचा वारू चौफेर उधळला गेला, विरोधातील नेतृत्व राज्याच्या मंत्री मंडळात तब्बल 4 खात्याचा मंत्री असताना देखील परळीकर जनतेने विरोधी पक्षातील एका नेत्याच्या पारड्यात आपला कौल द्यावा हा म्हणजे त्यांचा आपल्या लाडक्या नेतृत्वावरील विश्वास होय.....!
प्रतिष्ठित राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात जन्म होऊन देखील धनंजय मुंडेंना काही वशिलेबाजी ने मिळाले नाही , ते त्यांनी मिळवले स्वकर्तृत्वानेच...!
                        म्हणतात ना जर तुमच्यात दम असेल कर्तृत्व असेल आणि तुमची नाळ सर्वसामान्य जनतेशी जुळलेली असेल तर राजकारणात तुम्हाला मोठं होण्यापासून कोणी रोखू शकत नाही हे धनंजय मुंडेंकडे पाहिल्यास समजते.
           
 - आदित्य मुंडे ( संग्रहित लेख )

मला समजलेले धनूभाऊ



"धनंजय पंडितराव मुंडे "हे नाव मला 2002 ला कळलं त्यावर्षी च पहिली भेट आणि ओळख झाली तेव्हा मी फक्त 15 वर्षे वयाचा असेल ज्या दिवशी ओळख झाली तो दिवस म्हणजे ज्या दिवशी धनुभाऊच्या राजकीय आयुष्याची सुरुवात झाली ते पहिली निवडणूक जिंकले होते घरचा हक्काचा विजयाची हमी असलेला गाढेपिंपळगाव हा मतदारसंघ सोडून एकदम अडचणी चा आणि अवघड अश्या (उजनी जी प गटातून)अटीतटीच्या लढतीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाले होते. सुरुवातीपासूनच या माणसाला प्रवाहाच्या विरोधात जाऊन संघर्ष करून आपलं अस्तिव निर्माण करण्याची जिद्द होती.. म्हणतात ना "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" ते त्यावेळीच दिसलं होत
मला क्रिकेट ची खूप आवड होती आणि धनुभाऊ ना पण.. त्यांच्यासारख क्रीडाप्रेमी नेत्रत्व होत म्हणून तर त्यांच्या माध्यमातून परळी सारख्या ग्रामीण भागातून बऱ्याच क्रिकेटपटूनी राज्यपातळीवर परळीच नाव गाजवलं.. त्यांचा स्वामी विवेकानंद क्रिडा प्रसारक मंडळ आताचे (नाथ प्रतिष्ठान) क्रिकेट क्लब होता याच क्रीडा मंडळाने 1995 पासून स्व मुंडे साहेबांच्या  वाढदिवसानिमित्त दरवर्षी देशपातळीवरील क्रिकेट स्पर्धा आयोजित करून परळी सारख्या ग्रामीण भागातील क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना वर्षनुवर्षं जणू क्रीडा मेजवानीच दिली कपिल देव,मो.आझरुद्दीन, रॉबिन सिंग,नयन मोंगिया, सलील अकोला,लक्ष्मीकांत बेर्डे या बड्या हस्ती नां परळीत धनुभाऊनी क्लब च्या माध्यमातून समस्त परळीकरांच्या भेटीला आणल..
मी 2002 ला तो क्लब ज्वाईन केला आणि नंतर त्यांच्या जणू धनुभाऊंच्या मित्र परिवारातील सदस्यच झालो..!

राजकीय प्रगल्भता आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणाऱ्या धनुभाऊं नि त्याच वयात आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली याच धर्तीवर नाथ प्रतिष्टान च्या माध्यमातून धनुभाऊं नि परळी मतदारसंघातील गोरगरीब सामान्य कुटुंबातील बहिणींचे लग्न (सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा) दरवर्षी लावून द्यायचा महायज्ञ पेटवला तो आजही पेटलेलाच आहे. आजही प्रत्येक वर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात कधी 150 तर कधी 200 असे विवाह धनुभाऊं लावून देतात..!
हळूहळू हे युवा नेत्रत्व जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्रच्या राजकारणात आपली वेगळी छाप वेगळा ठसा उमटवत होत 2006 ला तत्कालीन भाजप श्रेष्ठीना या वाघाच्या छाव्या ची दखल घ्यावी लागली आणि भा. ज. युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी धनुभाऊ ची निवड झाली
तो पर्यंत मी पण त्यांचा कार्यकर्ता आणि सहकारी बनलो होतो गर्व आणि अभिमान वाटायचा भाऊंचा कार्यकर्ता म्हणलं की... तशी ओळख, तसा दरारा, तशी छाप, तसा रुबाब,  तसा वक्ता, तसा धाडसी रुबाबदार, अतिशय मायाळू, कार्यकर्त्यांना जीव लावणारा नेता लाभायला पण नशीब लागत. कोणत्याही कार्यकर्त्याला धनुभाऊ नि कार्यकर्ता म्हणून वागविले नाही तर लहान मोठा भाऊ म्हणूनच वागणूक दिलीय.
2007 ला परत( पट्टीवडगाव गट) जी प ची अटीतटीची निवडणूक अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप मोठ्या फरकाने धनुभाऊ जिंकले आणि बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेच्या सिंहासनावर बसले..!

उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात जिल्हाभर अगणित विकासकामे केली त्यामुळे जिल्ह्यात त्यांना मानणारी तरुण आणि प्रौढ कार्यकर्त्यांची फळी आपोआपच तयार होत गेली आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली.! गोरगरीब, दिन दलित, गरजू लोकांच्या अडीअडचणी जिकिरी ने आणि प्रथम प्रधान्य देऊन तळमळीने सोडवण्याची वेगळीच हातोटी आणि सर्वसामान्यां साठीची धडपड ह्या जनतेच्या मनाला भावून जाणाऱ्या गोष्टी त्याच वेळी सांगत होत्या की हा माणूस केवळ इथंच थांबणारा नाही किंवा एका जिल्ह्यापुरता मर्यादित नाही उद्याच महाराष्ट्राच उज्वल भविष्य आहे..!
पुढं चालून धनुभाऊ च्या कार्याचा आलेख वाढत गेला आणि धनुभाऊ भा.ज.यु.मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष झाले आणि आजचे मुख्यमंत्री फडणवीस त्याच युवा मोर्च्या च्या बॉडीमध्ये सरचिटणीस पदी होते त्यावेळी धनुभाऊंनी फडणवीस साहेबांच पण नेत्रत्व केलं आहे..!

आजच्या पंतप्रधान मोदी साहेबांना पहिल्यांदा महाराष्ट्र्रात जर कोणी आणले असेल तर ते पुण्यात 2008 ला भव्यदिव्य कार्यकर्ता मेळाव्याच्या सभेचा कार्यक्रम आयोजित करणारे वाघ धनुभाऊ..

धनंजय मुंडे साहेबांच्या संघर्ष शील कार्याचा पाडा आणि त्यांची जीवणगाथा एका लेखात लिहिताच येत नाही.

- नंदकिशोर मुंडे ( संग्रहित लेख )

ना.धनंजय मुंडे..ग्रामीण राजकारणाची नाडी जाणनारा चेहरा

ना.धनंजय मुंडे ग्रामीण राजकारणाची नाडी जाणनारा चेहरा..

महाभारता मध्ये अर्जुना चा दुसर नाव ;धनंजय; हे नावच बरच काही सांगून जाता .नावातच ;धन आणि जय आसलेल्या या महाराष्टाच्या नव्या चेहऱ्या कडे पहिले जाते. आपल्या नावतल्या ;धन; या शब्दाला तो जनता रूपी धन समजतो .तर जय,, या शब्द विजय नसून ते आहै जय रुपी कर्तुत्व .आज पाहिलं गेलं तर त्या विधानपरिषेदेच्या च्या रेड कार्पेट वरच्या बाकावर घुमनारा विरोधी आवाज म्हणजे धनंजय मुंडे . जि. प. पासून काकांच्या राजकीय गुणांचे रिव्हिजन करत प्रवास सुरु झाला. ग्रामीण भागातील जनते चे प्रश्न कशे सोडवावेत याची नाडी जाणणारा हा विश्लेषनिया भाषण शैली , हजरजबाबी , अभ्यासू वेक्तिमत्व असलेला नेता. राजकारणातील कुबेर असलेले शरदचंद्र जी पवार साहेब यांचे तोंडून जर एखादा प्रतिभा शाली युवा विरोधीपक्ष नेता होत असेल तर तो तसा हुशार आणि नशीबवान असायला हवा. आज बघितलं गेलं तर परिषदे मध्ये
वेगवेगळ्या मुद्दे हातात घेऊवून सरकार ला धारे वर धरत त्या वर अभ्यासू भाषण देऊन त्याचा जनते साठी महत्व किती आहै हे अशे मुद्दे त्यानी गाजवलेले अहैत. मंग ते कोपार्डी प्रकरना तील आरोपीचा मुदा असो ,नाही तर तो मराठा आरक्षण असो.अश्याच प्रकारे संगणक परीचालक चा मुदा असो . किंवा त्या शेतकरी कर्ज माफी मधील खारी चा वाटा .आश्या प्रकारच्या मुद्या साठी त्याना ओळखला जाता. धनंजय मुंडे यांचा प्रवास ग्रामीण ते शहरी आहे. त्या मुळे ग्रामीण भागातील जनते चे प्रश्न कश्या प्रकारची आहेत हे त्याना चांगलंच माहित आहै. म्हणून महाराष्टाच्या राजकारणातील नवा चेहरा म्हणून त्यान्च्या कडे अशे ने पाहिला जाता आज धनंजय मुंडे हे केवळ जिल्ह्या पुरता नेतृत्व राहिलेला नसून ते एका महाराष्ट्राचा युवक आदर्श नेतृत्व बनलं आहे. भविष्यात हे नेतृत्व महाराष्टाच्या शीर पेचात तुरा रवल्या शिवाय राहणार नाही..हे तीतकेच खरे राहील..!

- शाम के गित्ते व राम के गित्ते यांचे दोन संग्रहित लेख

"जैसे सुख दुःख आपुले देही,तैसेचि सर्वांभूती पाही!" धनं-विजय



आजच्या महाराष्ट्राला धनंजय मुंडे हे नाव श्रुत आहे, पण काका पुतणे असे राजकीय समीकरण असलेल्या पुरोगामी महाराष्ट्राला साधारण 15 ते 20 वर्षांपूर्वी धनंजय म्हणजे स्व. गोपीनाथ मुंडे यांचा पुतण्या एवढीच ओळख होती, पण खरंच असं होतं का ? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी परळी म्हणजे पूर्वीच्या रेणापूर मतदारसंघाचा इतिहास उखडून बघावा लागेल.1991-92 ला पहिल्यांदा स्व.मुंडे साहेब राज्याचे विरोधी पक्षनेते झाल्यापासून म्हणजे धनंजय यांच्या अगदी नवतारुण्यापासून थेट जनतेशी जोडले गेले. स्व.मुंडे साहेब राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आणि स्थानिक जबाबदाऱ्या पर्यायाने स्व. पंडित अण्णा व नवतरुण धनंजय यांच्यावर आल्या. त्यानंतर स्व. मुंडे साहेबाना स्वतःच्या मतदार संघात मागे वळून पहायची वेळ क्वचितच आली असेल! हळू हळू वडील व चुलते या दोन मातब्बर राजकारण्यांच्या शाळेतला धनंजय हा विद्यार्थी राजकारणाचे धडे गिरवत गेला!

सार्वजनिक काम असो,सामाजिक अडी-अडचणी असोत,किंवा कोणाचे वैयक्तिक काही काम असो, धनंजय कडे गेलेला माणूस कधीच निराश ओरतला नाही, हे आजही अभिमानाने सांगता येईल.

जसजसे हे युवा नेतृत्व बहरत गेले तसतसे धनंजय यांचा चाहता वर्ग वाढत गेला, सोबतच काही स्वार्थी व विघनसंतोषी लोकांच्या डोळ्यात खुपत गेला. पुढे बीड जिल्हा परिषदेमध्ये सत्तेसाठी झालेल्या घडामोडी असतील किंवा विधानसभा-लोकसभा निवडणुकीतले जय-पराजय असतील, धनंजय यांनी सगळ्या परिस्थितीला मात देताना जी राजकीय पतीपक्वता दाखवली त्यातूनच भाजपा नेतृत्वाने युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष पदाची सूत्रे धनंजय यांच्या ताब्यात दिली! नरेंद्र मोदी यांची त्या कालची पुणे येथील महासभा ही या निवडीला सार्थ ठरवून ह्या युवा नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारी ठरली. तिथूनच खऱ्या धनंजय पर्वाची नांदी झाली म्हणावे लागेल! पण नियतीला व त्यांच्या राजकीय शत्रूंना कदाचित हे मान्य नसावं, म्हणूनच 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज भरायच्या दिवशी माघार घ्यावी लागली, पण तरीही धनंजय यांनी पक्षधर्म व कुटुंबधर्म सांभाळत मोठ्या मनाने लहान बहिणीचा प्रचार केला, निवडूनसुद्धा आणल!

पुढे मुंडे कुटुंबात झालेले सर्व विषय संबंध महाराष्ट्राने पाहिले. शेवटी स्वतःचे अस्तित्व आणि कर्तृत्व सिद्ध करायला एकटाच घराबाहेर पडलेला हाच धनंजय आज नामदार धनंजय मुंडे झालेला संबंध महाराष्ट्राने पाहिला!

काकांशी गद्दारी केली,बहिणीचा विरोध करण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याना मुद्दाम मोठं पद दिलं, असे अनेक आरोप धनंजयवर झाले, काही लोक सोशल मीडियावर आजही त्या चर्चा रंगवतात. परंतु अविरत संघर्ष,जनतेशी थेट जोडलेले ऋणानुबंध,असा हजारो किलोमीटर चा प्रवास करत असताना धनंजय यांनी आपले संघटन कौशल्य, मतदारसंघावर तयार केलेली मजबूत पकड आणि आपली जबरदस्त भाषण शैली यांच्या जोरावर ह्या सर्व चर्चा फोल ठरवल्या! आपल्या अभ्यासू, निर्भीड भाषणातून त्यांनी विरोधी पक्षनेता कसा असावा याचे एक उत्कृष्ट उदाहरण प्रस्थापित केले.

काही जातीयवादी संघटना संकुचित विचार मनात ठेवून सोशल मीडिया सारख्या माध्यमांमध्ये धनंजय यांच्यावर सातत्याने व हेतुपुरस्सर टीका करून समाजासमोर खलनायक अशी प्रतिमा तयार करायचा केविलवाणा प्रयत्न करतात, काहींनी तर राजकीय व कौटुंबिक मिश्रण तयार करून भावणीकतेचा आधार घेत धनंजय यांना परळीच्या कुरुक्षेत्रांतले कौरव ठरवायचा प्रयत्न देखील केला. पण एकंदरीत पूर्ण माहिती घेऊन सत्य स्वीकारून उदाहरणे व्यवस्थित तपासून पाहिली तरच खरं सत्य लक्षात येईल. धनंजय हे आज राजकीय धुरंदर समजल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत, एवढेच नव्हे तर सत्ताधारी पक्षात सुद्धा त्यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त मान सन्मान आहे, याची प्रचिती मंत्रायलायत गेल्यावर येते! टीकाकारांनी याची सत्यता मात्र अवश्य पडताळून पहावी. राजकीय मतभेद कौटुंबिक कलह आणि वैयक्तिक द्वेष यातला फरक समजायला समाजसपणाच नव्हे तर तेवढी परिपक्वता पण लागते ! विविध दुःखद प्रसंगामुळे सलग तीन वर्षे वाढदिवस साजरा न करणे, वाढदीवसाला हार तुरे न स्वीकारणे यातून धनंजय यांची नैतिकताच नव्हे तर मनाचा मोठेपणा पण दिसून येतो.

म्हणूनच सरते शेवटी एवढंच सांगावस वाटतं की धनंजय मुंडे हे राज्य व बीड जिल्ह्यातील राजकारणातले भीष्म जरी ठरले असले तरी कौटुंबीक व परळीच्या कुरुक्षेत्रात मात्र धर्मवीर युधिष्ठिराच्या भूमिकेत आहेत व शेवटपर्यंत राहतील! तसे लिहायला अजून बरेच काही आहे पण आज वाढदिवसानिमित्त परळीच्या या धर्मवीर युधिष्ठिरास अभिष्टचिंतन व शतशः नमन!

- सुधीर सांगळे ( संग्रहित लेख )