शनिवार, २९ जुलै, २०१७

अन्याय कि गद्दारी..भाग-2

स्व.मुंडे साहेबांनी आदेश दिला सर्व कार्यकर्ते आणि परळीकर खुश होते. धनुभाऊ हे तर पूर्ण ताकदीनिशी कामाला लागले होते रोज कमीत कमी 5 गावच्या लोकांच्या गाठीभेटी घेऊन अडीअडचणी सोडवल्या शिवाय घरी येत नव्हते. आणि घरी येऊन सुद्धा बाहेर गावावरून आलेल्या लोकांच्या अडचणी अगदी आमदार म्हणूनच सोडवत होते.
त्या वेळचा एक प्रसंग आठवला ज्या ठिकाणी सभा आहे त्या प्रत्येक सभेत सूत्रसंचलन करणारी व्यक्ती धनुभाऊच स्वागत 288 आमदारा पैकी सर्वात तरुण तडफदार अभ्यासू आमदार अश्या उल्लेखाने करत असे.
तर त्यावर धनुभाऊच उत्तर असायचं मी अजून आमदार झालो नाही पण 50 आमदारांची ताकद माझ्यात आहे..!
कदाचित नियती पुढं काय करील याची चुणूक लागली असेल त्यांना.
इकडे मतदारसंघात हा माणूस अगदी जिवाच रान करत रात्रीचा दिवस अन दिवसाची रात्र करून अगदीच तन, मन,धनाने सर्व जनतेसमोर जात होता आणि तिकडे मुंबईत परळीतिलच काही पांढरपेशी लोक ज्यांना फक्त साहेबांकडून आयते गबाळ हाणण्यात इंट्रेस होता असे पांढरपेशी लोक धनंजय मुंडे च्या विरोधात स्व मुंडे साहेबांचे कान भरवत होती पर्यायाने साहेबांच्या आदेशाची आणि धनंजय मुंडे च्या स्वप्नाची चिता तयार करत होती.
2009विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली होती सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले होते त्यात त्या बातम्या कानावर येऊन गेल्या होत्या पक्ष्याची पहिली यादी प्रसिद्ध झाली त्यात धनुभाऊ च नाव नव्हते तिथंच मनात संशयाची पाल चुकचुकली होती पण शेवट पर्यंत आपलं नाव येईल असं वाटत होत. अंतिम यादिला अवघे 2 दिवस उरले होते यादी प्रसिद्ध झाली आणि परळी चा उमेदवार धनंजय मुंडे नसून पंकजा ताई आहेत हे कळलं त्यावेळी कोणालाही ऐनवेळी नाव बदलण्यात आलंय हा विश्वासच बसत नव्हता कारण की ना कुठली मागणी न चर्चा न काम म्हणून जो तो म्हणत होता हि फेक न्यूज आहे पण तीच खरी न्यूज होती...! काही मोजक्या पांढरपेशी लोकांच्या म्हणण्यावरून धनंजयमुंडे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती...!
लगेचच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी व तेव्हा चे (युवा मोर्च्या प्रमुख)निळूभाऊ नि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्व.मुंडे साहेब स्व.पंडित आंण्णा आणि खुद्द धनंजय_मुंडे यांच्या भागवत मंगल कार्यालय येथे बैठकीचे आयोजन केलं होतं त्यात सर्वांनी एकमुखाने स्व.मुंडे साहेबांना उमेदवारीचा फेरविचार करून धनंजय मुंडे यांना उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणी केली होती पण ती सर्व कार्यकर्त्यांची मागणी सुद्धा त्यावेळी कामाला आली नाही..!
विषय तो नव्हताच की ताईंना उमेदवारी का दिली..!
विषय होता तो 6 महिन्याने आधी आदेश देऊन आशेला लावून धनंजय मुंडे ना मतदारसंघ पिंजून काढायला लावायला नाही पाहिजे होता आणी धनंजय मुंडे हे लोकांसमोर आमदार म्हणूनच गेलेले होते तर तो त्यांचा जनतेत किती मोठा अपमान होता हस झालं होतं जिकड तिकडं सर्वांचेच...! धनंजय_मुंडे ची आशामोड झाली होती.!
सर्व कार्यकर्ते नाराज निराश झालेले असताना त्यांच्यात नवा जोश भरून त्यांना नाही नाही तसल्या शपथा घालून हि निवडणूक जर आपण काही भलं बुर कराल तर त्याचा शिक्का आयुष्यभर माझ्या कपाळी बसेल म्हणून सर्व कार्यकर्त्याना कामाला लावले..!
एवढं सगळं होऊनही एवढी निराशा आशामोड अपमान होऊनही कसलीही निराशा नाराजी न दाखवता धनंजय नावाच्या वाघान पंकजा ताई च्या निवडणुकीची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन ताईचा विजय सुकर केला आणि 36000 हजारांनी ताईचा विजय झाला..!

- नंदकिशोर मुंडे ( संग्रहित लेख ) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा