मंगळवार, १८ जुलै, २०१७

मला समजलेले धनूभाऊ



"धनंजय पंडितराव मुंडे "हे नाव मला 2002 ला कळलं त्यावर्षी च पहिली भेट आणि ओळख झाली तेव्हा मी फक्त 15 वर्षे वयाचा असेल ज्या दिवशी ओळख झाली तो दिवस म्हणजे ज्या दिवशी धनुभाऊच्या राजकीय आयुष्याची सुरुवात झाली ते पहिली निवडणूक जिंकले होते घरचा हक्काचा विजयाची हमी असलेला गाढेपिंपळगाव हा मतदारसंघ सोडून एकदम अडचणी चा आणि अवघड अश्या (उजनी जी प गटातून)अटीतटीच्या लढतीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाले होते. सुरुवातीपासूनच या माणसाला प्रवाहाच्या विरोधात जाऊन संघर्ष करून आपलं अस्तिव निर्माण करण्याची जिद्द होती.. म्हणतात ना "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" ते त्यावेळीच दिसलं होत
मला क्रिकेट ची खूप आवड होती आणि धनुभाऊ ना पण.. त्यांच्यासारख क्रीडाप्रेमी नेत्रत्व होत म्हणून तर त्यांच्या माध्यमातून परळी सारख्या ग्रामीण भागातून बऱ्याच क्रिकेटपटूनी राज्यपातळीवर परळीच नाव गाजवलं.. त्यांचा स्वामी विवेकानंद क्रिडा प्रसारक मंडळ आताचे (नाथ प्रतिष्ठान) क्रिकेट क्लब होता याच क्रीडा मंडळाने 1995 पासून स्व मुंडे साहेबांच्या  वाढदिवसानिमित्त दरवर्षी देशपातळीवरील क्रिकेट स्पर्धा आयोजित करून परळी सारख्या ग्रामीण भागातील क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना वर्षनुवर्षं जणू क्रीडा मेजवानीच दिली कपिल देव,मो.आझरुद्दीन, रॉबिन सिंग,नयन मोंगिया, सलील अकोला,लक्ष्मीकांत बेर्डे या बड्या हस्ती नां परळीत धनुभाऊनी क्लब च्या माध्यमातून समस्त परळीकरांच्या भेटीला आणल..
मी 2002 ला तो क्लब ज्वाईन केला आणि नंतर त्यांच्या जणू धनुभाऊंच्या मित्र परिवारातील सदस्यच झालो..!

राजकीय प्रगल्भता आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणाऱ्या धनुभाऊं नि त्याच वयात आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली याच धर्तीवर नाथ प्रतिष्टान च्या माध्यमातून धनुभाऊं नि परळी मतदारसंघातील गोरगरीब सामान्य कुटुंबातील बहिणींचे लग्न (सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा) दरवर्षी लावून द्यायचा महायज्ञ पेटवला तो आजही पेटलेलाच आहे. आजही प्रत्येक वर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात कधी 150 तर कधी 200 असे विवाह धनुभाऊं लावून देतात..!
हळूहळू हे युवा नेत्रत्व जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्रच्या राजकारणात आपली वेगळी छाप वेगळा ठसा उमटवत होत 2006 ला तत्कालीन भाजप श्रेष्ठीना या वाघाच्या छाव्या ची दखल घ्यावी लागली आणि भा. ज. युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी धनुभाऊ ची निवड झाली
तो पर्यंत मी पण त्यांचा कार्यकर्ता आणि सहकारी बनलो होतो गर्व आणि अभिमान वाटायचा भाऊंचा कार्यकर्ता म्हणलं की... तशी ओळख, तसा दरारा, तशी छाप, तसा रुबाब,  तसा वक्ता, तसा धाडसी रुबाबदार, अतिशय मायाळू, कार्यकर्त्यांना जीव लावणारा नेता लाभायला पण नशीब लागत. कोणत्याही कार्यकर्त्याला धनुभाऊ नि कार्यकर्ता म्हणून वागविले नाही तर लहान मोठा भाऊ म्हणूनच वागणूक दिलीय.
2007 ला परत( पट्टीवडगाव गट) जी प ची अटीतटीची निवडणूक अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप मोठ्या फरकाने धनुभाऊ जिंकले आणि बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेच्या सिंहासनावर बसले..!

उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात जिल्हाभर अगणित विकासकामे केली त्यामुळे जिल्ह्यात त्यांना मानणारी तरुण आणि प्रौढ कार्यकर्त्यांची फळी आपोआपच तयार होत गेली आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली.! गोरगरीब, दिन दलित, गरजू लोकांच्या अडीअडचणी जिकिरी ने आणि प्रथम प्रधान्य देऊन तळमळीने सोडवण्याची वेगळीच हातोटी आणि सर्वसामान्यां साठीची धडपड ह्या जनतेच्या मनाला भावून जाणाऱ्या गोष्टी त्याच वेळी सांगत होत्या की हा माणूस केवळ इथंच थांबणारा नाही किंवा एका जिल्ह्यापुरता मर्यादित नाही उद्याच महाराष्ट्राच उज्वल भविष्य आहे..!
पुढं चालून धनुभाऊ च्या कार्याचा आलेख वाढत गेला आणि धनुभाऊ भा.ज.यु.मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष झाले आणि आजचे मुख्यमंत्री फडणवीस त्याच युवा मोर्च्या च्या बॉडीमध्ये सरचिटणीस पदी होते त्यावेळी धनुभाऊंनी फडणवीस साहेबांच पण नेत्रत्व केलं आहे..!

आजच्या पंतप्रधान मोदी साहेबांना पहिल्यांदा महाराष्ट्र्रात जर कोणी आणले असेल तर ते पुण्यात 2008 ला भव्यदिव्य कार्यकर्ता मेळाव्याच्या सभेचा कार्यक्रम आयोजित करणारे वाघ धनुभाऊ..

धनंजय मुंडे साहेबांच्या संघर्ष शील कार्याचा पाडा आणि त्यांची जीवणगाथा एका लेखात लिहिताच येत नाही.

- नंदकिशोर मुंडे ( संग्रहित लेख )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा