बालाघाट म्हंटल कि आठवतो तो संघर्षशील लोकांचा मराठवाडा मागच्या दोन ते तीन वर्षात बालाघाट डोंगरी पट्यात राहणाऱ्या लोंकाना जास्तीचाच संघर्ष करावा लागलाय कारण सततचा दुष्काळ आणि नापिकी त्यामुळे येथील लोकांना जगन कठीन बनलं पण त्या दुष्काळ परिस्थिती मध्ये बालाघाटच्या डोंगर रांगातून उगवला एक सूर्य आणि आशेचा किरण ते म्हणजे धनंजय मुंडे साहेब, साहेबांच्या रूपाने आणि शेतकऱ्यांना कुठे तरी वाटायला लागलं की आपल्याला हा माणूस न्याय मिळवून देऊ शकतो
निसर्गाने जरी या भागाशी भेदभाव केलेला असला तरी साहेबांच्या रूपाने एक बदल घडवून इच्छिणारे मसिहा आपणास पाहावयास मिळत आहे येथील परिस्थितीवर मांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या फोल असणाऱ्या समीकरनाना तोडीस जबाब देणारा विरोधक म्हणजे ना धनंजय मुंडे हे नाव दुष्काळी परिस्थिती जनावरानच्या चाऱ्याचे होणारे हाल पाहून त्यांच्या चाऱ्याची सोय करणाऱ्या छावणी पुरुषास दाद द्यायला हवी. .
त्यांनी चारा छावण्या पुन्हा सुरु कराव्यात या प्रश्न बदल सभागृहात आवाज उठवला आणि आक्रमक पवित्रा घेतला आणि आज त्यांच्या मुळे गुरे व जनावरे जगतायत या वरून त्यांच प्राणिमात्रावरच विलक्षणीय प्रेम दिसून येत
दुष्काळ प्रवन क्षेत्रात सत्ताधारी फक्त ए सी गाडीत बसून दोरे करत होते पण ते फक्त ओपचारिकता पूर्ण करत होते
पण धनंजय मुंडे हे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस च्या उन्हात शेतकऱ्याच्या बाधावर बसून बळीराज्याच्या परिस्थितीचा आढावा घेत राहिले आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम ते करत होते आणि वरील कामांची पोच पावती त्यांना जनतेनी आताच झालेल्या निवडणुका जि प व पंचायत समितीच्या मधे जनतेनी त्यांना डोक्यावर घेतलं आणि सर्वाधिक मताधिक्य राष्ट्वादि पार्टीला मिळाले व मुंडे यांच्यावरील प्रेम मतांद्वारे दाखवून दिल सध्याच्या परळी मतदार संघातील सतेतील नेत्रत्वाल मोठा फटका त्यांनी दिला आणि धनंजय मुंडे हे या मतदार संघाचे खरे विकासाभिमुख आहेत बहे मताद्वारे दाखून दिले
एकापेक्षा एक सरस कामांमुळे मुंडे यांच नेत्रत्व आता बीड जिल्ह्या पुरत राहील नसून व मराठवाड्या पुरत नसून या नेत्रवत्वाची व्याप्ती आख्या महाराष्ट्र् भर विस्तारित होत आहे
नेत्रत्वाच्या विस्तरामुळे ओ बी सी चा महाराष्ट्रातील नवा चेहरा म्हणून मुंडे यांच्या कडे पाहिलं जात आहे पण मुंडे यांचा लढा फक्त ओ बी सी जनते पुरता नाही मुंडे यांचा लढा हा पुर्न जाती पातीन साठी आहे हे त्यांनी मराठा आरक्षण बदल सभागृहात आपला आवाज उंचावून पूर्ण महाराष्ट्राला त्यांनी दाखून दिल
मंग ते धनगर समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल यांच्या आरशनाबदल व न्याया बदल मुंडे यांचा अविरत संघर्ष चालूच आहे. जो पर्यंत महाराष्ट्रातील समाजाना योग्य दिश्या व योग्य सन्मान मिळत नाही तो पर्यंत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्या शिवाय राहणार नाहीत यात शंका नाही..!
- शाम के गित्ते ( संग्रहित लेख)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा