बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

धनंजय मुंडे - मरगळलेल्या विरोधकांतील बुलंद आवाज


विधान परिषदेच्या इतिहासात प्रथमच सत्ताधार्यांनी शोधली पळवाट..

आज विधान परिषदेचे कामकाज सुरु झालेकिच विरोधी पक्षनेते धनंजयजी मुंडे साहेबांनी सरकारला राज्यात सध्या गाजत असलेल्या तथाकथित समृद्धी महामार्ग घोटाळा, मंत्री प्रकाश मेहतांचे SRA प्रकरण , पीकविमा भरण्यासाठी चालू असलेला गोंधळ आणि रत्नाकर गुट्टे च शेतकऱ्यांना फसविलेले प्रकरण इत्यादी गोष्टी आज साहेबांनी लक्षवेधी मध्ये मांडून सरकारला अक्षरशः झोडपुन काढले ,साहेबांचा आक्रमकपणा पाहून सरकारमधील सर्व प्रतिनिधी अक्षरशः सभागृहातून उठून पळाले.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना विधी मंडळात विरोधी पक्ष नेते नारायण राणे यांचा एक अभ्यासू विरोधक म्हणून सत्काराचा ठराव मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात मांडला होता,आणी तो एकमुखाने संमत होताना महाराष्ट्राने पाहिले आहे.अशाच तोडीचा विरोधी पक्षनेता म्हणून धनंजय मुंडे नावाचा अभ्यासू नेता विरोधकांना गवसला आहे.विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांना निशब्द करून सदन सोडायला लावणारा नेता म्हणून धनंजय मुंडेंची नोंद  इतिहासात घेतली जाणार.आक्रमक भाषेला अभ्यासाची जोड देऊन संयत भाषेत सवाल उपस्थित करण्याची किमया धनंजय मुंडेंना अवगत आहे.याचा प्रत्यय अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांच्यात झालेल्या खडाजंगीत आली होती.तेव्हा मुख्यमंत्र्यांना गप बसावे लागले होते, आणि याच किमयाच्या जोरावर आज सत्ताधाऱ्यांचे दात त्यांच्याच  घशात घातले.
भाजप मध्ये असताना कदाचित याच टॅलेंटची कदर झाली नाही,इकडे एक संधी मिळाली.आणि संधीचा वारू इतका उधळला की यांच्या भाषणाने परिषद अवाक झाली. विशेष म्हणजे  स्वतःच्या जातीपलीकडे विचार करून सर्वसमावेशक भूमिका घेऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा परिषदेत वाचा फोडली.हे वैशिष्ट्यगुण येत्या काळात धनंजय मुंडे राज्याचा नेता होण्यास पूरक ठरतील.विरोधक जेव्हा सत्तेत जातात तेव्हा ते विरोधक असतानाचा आव विसरत नाही याचे बरेचसे उदाहरण सध्या दिसतील.पण मला खात्री आहे की धनंजय मुंडे यांच्याबद्दल असे होणार नाही.जेवढे विरोधक म्हणून ते सध्या कारकीर्द गाजवत आहे , तितकेच ते सत्तेत आल्यावर देखील लोकांचे तत्परतेने काम करतील.
तूर्तास आज तरी धनंजय मुंडेंनी इतिहास घडविला आहे.त्यांना शुभेच्छा .

- प्रतिक शिवाजीराव पाटील

५ टिप्पण्या:

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. मुंडेसाहेब हे विलासराव देशमुख व गोपिनाथ मुंडे चे दुसरेरूप आहे व मराठवाड्याचा बुलंन्द आवाज आहेत

    उत्तर द्याहटवा
  3. मुंडेसाहेब हे विलासराव देशमुख व गोपिनाथ मुंडे चे दुसरेरूप आहे व मराठवाड्याचा बुलंन्द आवाज आहेत

    उत्तर द्याहटवा