सध्या राज्याच्या राजकारणात धनंजय मुंडे नावाचं एक वादळ घोंगावतय आणि हे वादळ गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत हादरे देत आहे. २०१४ ला या देशात लाट आली आणि अनेकजण लाटेवर स्वार झाले. पण लाटेवर स्वार झालेल्यांचा निभाव आता वादळापुढे लागणार नाही. आता लाट ओसरली आहे आणि वादळ निर्माण झालेलं आहे. लाट वरून खाली आली होती, वादळ खालून वर चाललं आहे. लाटेच्या तडाख्यात अनेकांना घरी बसावं लागलं पण त्यांनी आता उभारी घेतली आहे. वादळाच्या तडाख्यात घरीच बसावं लागेल परत उभारी सुद्धा घेता येणार नाही. लाट २०१४ ला तयार झाली होती. पण वादळ हे २०१९ पूर्वीच तयार झालं आहे. आणि म्हणून २०१९ ला वादळा पुढे कुणाचाच टिकाव लागणार नाही.
विधानपरिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून ते आपली भूमिका चोखपणे बजावत आहेत. त्यांनी सरकार मधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे पुराव्यासहित बाहेर काढले. पण या मंत्र्यावर कारवाई करण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. पारदर्शक कारभाराचा बुरखा घालणार्या सरकारमधील अनेक मंत्र्यांनी करोडो रुपयांचे घोटाळे केले आहेत. तरीही सरकार पारदर्शकतेचा आव आणित आहे. मुंडेंनी या सरकारच्या पारदर्शकतेचा बुरखा टराटर फाडला आहे.
कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, संपूर्ण शेतकरी कर्जमाफी अशा एकना अनेक समाजहिताच्या मुद्यांवर आवाज उठविला. त्यांनी अतिशय प्रभाविपणे हे मुद्दे विधान परिषदेत मांडले यावर चर्चाही घडवून आणली. वेळोवेळी सरकारचे लक्षही वेधून घेतले पण गेंड्याच्या कातडीचं सरकार असल्यामुळे या सरकारने अजून यावर ठोस निर्णय घेतलेला नाही. मुंढेंनी सरकारला ठणकावून सांगितले आहे की, वरील मुद्यांवर आता चर्चा नको निर्णय घ्या निर्णय ..
हे वादळ महाराष्ट्र तर काबीज करणारच आहे. पण दिल्ली सुद्धा हादरून सोडणार आहे. अशा अभ्यासू, हुशार, आक्रमक, समाजाप्रति तळमळ असणार्या वादळाची राष्ट्रवादीला आणि या महाराष्ट्राला नितांत गरज आहे. धनंजय मुंडे यांनी अल्पावधीतच महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेच्या मनात घर केलेलं आहे. धनंजय मुंडे हे विकासाचं वादळ आहे. आणि या वादळाचा झंझावात असाच सुरू राहिल, एवढं मात्र नक्की!
- अक्षय सोनवणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा