गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

गोपीनाथ मुंडे पुन्हा

स्व. गोपीनाथ मुंडे साहेब या माझ्या विचारमंथनातुन तुम्हाला अखेरची वैचारिक श्रद्धांजली.

साहेब आम्ही चुकलो.मुकलोत अगदी त्या नेतृत्वाला जे बहुजन समाजाचे भविष्य होते. तुमच्या अंतरात्रीची पीडा आम्हालाही तितकीच आहे जितकी आपल्याला होती. किती स्वप्न साठवून ठेवली होती तुम्ही मराठवाड्याच्या उषःकालासाठी.. पण डाव नियतीने कायमस्वरूपी मोडला तो आजतागायत पुनर्रचनेसाठी धाव घेत नाही.तुमची दुसर्‍यादिवशीची घोषणा ऐकण्यासाठी आजही आमचे कान प्रतिक्षेत आहेत.आपल्या निर्मळ अंतकरणातुन तयार झालेला विकासआराखडा पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी कासावीस जीव आजही प्रतिक्षेत आहेत. उत्तर सापडत नाही विकासआराखड्याबाबतीत आजही.. कि ते नाहीसे झाले कि जाळले गेले. पण आपली उणीव मात्र भासते.

नेतृत्व निवडीबाबत आपल्या मताशी आपले सर्व अनुयायी एकमत होते.. परंतु आपल्या शेवटच्या श्वासापर्यंतच... तिथुन पुढचा काळ साहेब आम्हाला काळरात्री प्रमाणे गेला. आपण ज्या मातृत्व, दातृत्वाच्या गोष्टी आमच्याशी केल्या ते पेलणार नेतृत्व आम्हाला सापडेना. आपण ज्या पक्षात राहुन तिथली व्यवस्था उभ्या जन्मी आपण मान्य केली नाही. त्या पक्षातील नवउमेदी लोकांनी आमच्या खांद्यावर पंकजाताईंची पताका दिली. अगदी सांगायचेच झाले तर आपल्या पोटच्या गोळ्याला आम्ही कसे फितुर होवु. म्हणुन इमानेइतबारे सेवा करण्याची संधी चुकवली नाही. पण साहेब आता सगळ बदललं आहे. तुम्हाला मान्य नसलेली व्यवस्था समाजात रुजवण्यात ताई कुठलीच कसर करत नाहीत.

नाविलाजे कुठेतरी तुमच्या विचारांचे पाईक असलेले आम्ही बंड करुन तुमचच प्रतिरुप असणारे धनंजय भाऊ यांचे पाईक झालोत. निष्ठाही तिथेच आहे फक्त विचारमुल्ये बदलली. जेकि आपण आम्हाला सांगितलेली आहेत.त्यांच्यात आम्हाला गोपीनाथ मुंडे दिसतात जे गोपीनाथ मुंडे व्यवस्था परिवर्तनासाठी ओळखले जातं. नाविलाज आहे साहेब.. पक्षापेक्षा आम्हाला तुमचे विचार जीवंत ठेवायचे आहेत.

पुन्हा एकदा माफी मागतो..

- रा.उ.कदम ( बीड) 

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

भगवानगडाला भक्तांची गरज आहे..वारसदारांची नाही! - भाग-2

भगवान सेनेच्या निर्मितीमुळे बिथरलेल्या काही लोकांनी राजकीय हेतुने जिल्ह्यात काही अनिष्ठ गोष्टी घडुन आणल्या परिणामी बहुजन समाज विशेषथा वंजारी समाज बिथरला त्याचा परिणाम भगवान सेनेच्या माध्यमातून वंजारी समाजात एक सामाजिक व राजकीय भान आले. संपूर्ण बीड जिल्ह्यात भगवान सेना नावाच्या संघटनेची आदरयुक्त भिती निर्माण झाली होती. याचा योग्य फायदा लोकनेते मुंडे साहेबांनी घेतला. शिवाजी वाघ या शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या हतेनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात राजकीय व सामाजिक अस्थिरथा निर्माण झाली. परिणामी लोकनेते मुंडेसाहेबांनी ही संघटना पुर्ण ताब्यात घेतली व 1993 ला पहिल्यांदा त्यांनी भगवान गडावर सामाजिक दृष्टया पहिला कार्यक्रम घेतला. तेंव्हा पासून दरवर्षी विजय दशमीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे, माजी मंत्री बबनराव ढाकणे, माजी मंत्री तुकाराम डिघोळे हे मान्यवर एकाच व्यासपीठावर येवु लागले.

1995 ला राज्यात सत्ता परिवर्तन झाले. गडाला राजकीय पाठबळ मिळाले. 1996 साली भगवान बाबांचे जन्मशताब्दी वर्षे होते. त्या निमित्ताने एक ऐतिहासिक अखंड हरिनाम सप्ताह घेण्यात आला. ज्या सप्ताहाचे संपुर्ण नेतृत्व आजचे महंत नामदेव शास्त्री यांनी केले होते. वास्तवीक भिमसिंहबाबा यांनी या संपुर्ण कार्यक्रमाची सुत्रे शास्त्रीकडे दिली होती. या सप्ताहानंतर 1997 ला सावरगाव या बाबांच्या मुळ जन्मगावी पुन्हा एक सप्ताहा झाला. त्याचे नियोजक स्वत: मुंडे साहेबांनी शास्त्रीवर सोपवले होते. एकीकडे अध्यात्मिक बाबतीत गडाची किर्ती वाढत असतांना दुसरीकडे मात्र गडावरच्या राजकीय भुमीकेला महत्व येवु लागले होते. 1999 ला राज्यातली युतीची सत्ता गेली होती. परंतू लोकनेते मुंडे यांनी भगवान गडाच्या माध्यमातून संपुर्ण ऊस तोडणार्‍या समाजावर आपला प्रभाव निर्माण केला होता.

 2003 साली नोव्हेंबर महिण्यात अचानक भिमसिंह बाबांचे आजारात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्यभरातल्या समाजाच्या मनात असलेल्या नामदेव शास्त्रींना सर्वा समक्ष या गादीचा वारसदार म्हणून  तत्कालीन गडाच्या तत्कालीन कार्यकारी मंडळाने बसवल्याचे जाहीर केले या वेळी मुंडे साहेब गडाचे ट्रस्टी नव्हते. मात्र ते समाजाचे नेते झाले होते.त्यामुळे समाजाच्या वतीने मुंडे साहेबांनी शास्त्रींच्या नावाची घोषणा केली तेंव्हापासून आजपर्यंत या पदावर शास्त्रींच्या काळात जे दसरा मेळावे झाले. त्या दसरा मेळाव्या बद्दल एक वेगळे सामाजिक समिकरण आपल्याला पहावयास मिळू  शकते. राज्यातील सत्ता गेली होती. सत्तेत असतांना भगवान गड हे माझे श्रध्दास्थान आहे असे साहेबांनी जाहीर केले होते. त्यामुळे एक भक्त म्हणून भगवान गडाच्या विकासात त्यांनी योगदान देण्याचा प्रयत्न केला होता. भगवान बाबांनी अत्यंत कष्टातून उभ्या केलेल्या या गडाचा, गादीचा अथवा महंताचा अनादर होईल असे कधीही विधान केले नाही किंवा त्यांच्या समर्थकांनाही कधीच त्यांच्या परस्पर गडाबद्दल अथवा महंताबद्दल वाईट बोलण्याची हिम्मत केली नाही. त्यामुळे भगवानगड व गोपीनाथ मुंडे हे एक समिकरण बनले होते.

प्रत्येक वर्षी दसर्‍याच्या पंधरा दिवसा अगोदर गडावर कोणत्या पक्षाचा अथवा कोणत्या गटाचा, कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा नेता आणायचा याचा संपूर्ण निर्णय स्वत: मुंडे साहेब घेत होते.काही दिवसांनी गडाची कार्यकारणी मंडळ मिटींग झाल्यास या गडाच्या ट्रस्टला अध्यक्ष म्हणून गोपीनाथ मुंडे हे न्याय देवु शकतील असा विश्वास डॉ.नामदेव शास्त्री यांना वाटला  व त्यामुळे त्यांनी स्वत: लोकनेते मुंडे साहेबांना अध्यक्ष होण्यासाठी सुचना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात भगवान गड हे मुंडे यांच्या बरोबरच राज्यात्ल्या अनेक लोकांचे श्रद्धेचे ठिकाण बनले. त्यांच्या अनेक भुमीका गडावरुन राज्यातल्या लोकांनी पाहिल्या . त्यांना कधी मुंबई दिसली कधी दिल्ली दिसली व शेवटच्या सभेत त्यांना स्वत:ची कन्याही दिसली व त्यांच्या प्रत्येक भुमीकेत गडाने कायम सकारात्मक विचार करीत त्यांना आशिर्वाद दिला. मुंडे साहेबांना गड एकतर्फी मदत करतो यामुळे इतर पक्षातल्या नेत्यांनी व त्या नेत्याबरोबर काम करणार्‍या समाजतल्या अनेक लोकांनी दसर्‍या दिवशी गडावर येणे बंद केले. गडाची प्रतिमा हळु हळु वंजारी समाजाचा गड अशीच बनली. या गोेष्टीचा प्रचंड त्रास महंतांना सहन करावा लागला. तरीही आपण योग्य मानसाच्या पाठीशी उभे आहोत या भुमीकेतून डॉ.नामदेव शास्त्री यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या भुमिकेचे समर्थन केले. परिणामी त्यांना त्याचा त्रासही सहन करावा लागला. गोपीनाथ मुंडे यांची उंची लक्षात घेतांना त्यांची व गडाची भक्ती लक्षात घेतांना त्यांचे भाषण राजकीय होते की, सामाजिक होते. यापेक्षा राज्यातल्या सर्व भागात आदरयुक्त भीतीचे होते हा मॅसेज गेल्यामुळे  त्यांना सर्वांनी स्विकारले त्यांच्या आकाली जाण्याने मात्र आज अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

2014 च्या दसरा मेळाव्यात गडाने राजकीय फायदयासाठी गड वापरला म्हणून गडाच्या ट्रस्टीसह महंतावर गुन्हा दाखल झाला. तब्बल तीन महिणे महंत फरार होते. या काळात त्यांची साधी चौकशी करण्याची सुद्धा कुणाला गरज वाटली नाही. त्यानंतर गडाच्या विकासात आपले फार मोठे योगदान आहे. या अविरभावात काही लोकांनी गड म्हणजे आपली खाजगी मालमत्ता आहे ही भुमीका घेण्यास सुरुवात केली. परिणामी अत्यंत थंड डोक्याने भगवान गडाच्या कार्यकारी मंडळाने भगवान गडावर राजकीय भाषण बंदीचा निर्णय घेतला.  हा निर्णय घेतांना महंताने वारसदारा बरोबर अनेक वेळा चर्चा केली. डिसेंबर 2015 साली लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिवशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथराव खडसे, रावसाहेब दानवे यांच्या समक्ष भगवान गडाचे महंत डॉ.नामदेव शास्त्री यांनी गोपीनाथगडाला शुभेच्छा देवुन या नंतर राजकीय भुमीका या गडावरुन तर धार्मीक भुमीका भगवानगडावरुन ठरेल व त्यामुळे राजकीय कोंडीत सापडलेला भगवान गड मोकळा श्वास घेईल असे जाहीर केले होते. तेंव्हा हजारो बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवुन याचे स्वागत केले होते. मात्र प्रत्यक्ष दसरा जसा-जसा जवळ येवु लागला तस-तसा सोशल मिडीयावर काही लोकांनी वाद घालण्यास सुरुवा केली. दोन्ही नेतृत्वाने ठरवुन घेतलेला निर्णय असतांना हा वाद निर्माण का केला गेला हे लोकांना कळु शकले नाही. परिणामी गेल्या वर्षी दसर्‍याच्या अगोदर सहा महिण्यापुर्वी कोठारबन तालुका वडवणी या गावात झालेल्या वार्षीक नारळी सप्ताहात संपुर्ण राजकीय  भाषण बंदी हा ठराव घेण्यात आला व तो आमलातही आणला गेला. या गोष्टीचा काही अंध भक्तांना प्रचंड राग आला व तब्बल पाच महिणे महंतांना खालच्या स्तरावर जावुन शिव्या देण्यात आल्या. वास्तविक वारसदाराने एक पोष्ट करुन हा चालेला सामाजिक गोंधळ थांबवु शकल्या असत्या मात्र आपले कडवे समर्थक कोणत्या टोकाला जावु शकता हे लोकांना दिसावे यासाठी प्रोत्साहन दिले. ठरावी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या व सामाजिक अस्थर्य निर्माण केले. परिणामी गडावर होणारा दसरा पायथ्यावर आला कार्यक्रमात बाहेरच्या लोकांना बोलवुन महंताला व या वादाशी संबंध नसलेल्या नेत्यांना शिव्या देण्यात आल्या एक वर्षात बरेच पाणी वाहुन गेले.

आता पुन्हा एकदा दोन दिवसावर दसरा आला आहे. गेल्या एक महिण्यापासून पुन्हा तोच विषय चर्चेत आणुन युवकांचे डोके भडकावले जावु लागले आहे. गेल्या वर्षी निघालेले मराठा मोर्चे, टप्प्यात आलेल्या नगर पालीका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, ओबीसी समाजात असुरक्षीतेची भावना या सर्व गोष्टीचा एकत्रीत मिलाप झाला व गडाच्या पायथ्याला लोक जमवण्यासाठी दसरा मेळाव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भाड्याच्या गाड्या लावुन मानसे जमवण्यात आले आपल्या पाठीमागे फार मोठा जमाव आहे असे चित्र निर्माण करण्यात आले आहे. त्याच वातावरणातून आजुन बाहेर निघाले नाही परिणामी यावर्षी पुन्हा असे काही करता येते का याचा प्रयत्न सुरु झाला. फार प्रयत्न करुनही वातावरण तापत नाही असे लक्षात आल्यानंतर युद्धात जिंकण्यासाठी वापरावयाचे शेवटचे हत्यार म्हणजे भावनीक वातावरण व आवाहन करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यातुनच अहंकारी भाषेतले पत्र महंतांना प्राप्त झाले आहे. ज्या पत्रातली भाषा मुलीने बापाला लिहीली असु शकत नाही तर सासरच्या त्रासाला वैतागलेली एकादी विवाहीता आत्महत्या करतांना या पद्धतीने पत्र लिहीते अशी ही भाषा आहे. त्या पत्रात ना भावनिक ओलाव आहे ना आत्मीक प्रेम समाजाच्या नावावर गेल्या तीन वर्षात कोणत्याच स्टेशनवर आथवा टॅक्सी स्टॅन्डवर न दिसलेला समाज या पत्रामुळे आम्हाला दिसला. ज्या गडावर भगवान बाबा आहे तीच समाजाची ऊर्जा आहे. त्यासाठी कुणाचे भाषण ऐकुन आमच्यात उर्जा येते या गोष्टीवरचा आमचा विश्वास मुंडे साहेबा बरोबर संपला आहे . त्यामुळे भगवान गडाला ना कुणाच्या भावनिक भाषणाची ना समाजाला कुणाच्या भाषणातल्या उर्जेची गरज आहे असे वाटत नाही. तरीही काही लोकांना वाटत असेल आपण भाषण करावेच तर त्यांच्यासाठी पायथा उपलब्ध आहे. तुम्ही तिथे या पण भगवान गडाचे भक्त म्हणून वारसदार म्हणून नाही. एवढीच अपेक्षा पत्र लिहीणाराकडून व्यक्त करतो.
जय भगवान...जय गोपीनाथ

- संग्रहित लेख


भगवानगडाला भक्तांची गरज आहे..वारसदारांची नाही! - भाग-1


बीड जिल्ह्यातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान गडाला गेल्या दोन वर्षात आनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. भगवान गड ही पवित्र भुमी संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे. साधारण 1940 च्या सुमारास नारायण गडाचा वाद सुरु झाले अनेक घडामोडी सुरु झाल्या त्यातुनच बाबांनी नारायण गडाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अंगावर असलेल्या कपड्या व्यतीरिक्त कोणतीही वस्तु किंवा संपती न घेता त्यांनी नारायण गडाचा जेंव्हा त्याग केला. तेंव्हा पुढे काय याचे कसलेही नियोजन नसतांना चालायला सुरुवात केली. खरवंडी ता.पाथर्डी येथील बाजीराव पाटील हे अत्यंत धार्मीक कुटूंब बाबांचे स्नेह होते त्यांना ही गोष्ट कळल्यावर बाबांची त्यांनी भेट घेतली. व त्यांना तेथेच थांबण्याची विनंती केली. काही दिवस थांबल्यानंतर खरवंडी जवळच एका उंच डोंगरावर बाबांनी थांबण्याचा निर्णय घेतला. ज्या डोंगराला धुम्या डोंगर नावाने ओळखले जाते. या ठिकाणी सुरुवातीला एक छोटेशे मंदीर होते. हळु हळु परिसर स्वच्छ होवु लागला. बाबा आता इथे थांबु शकतात. ही भक्तांना खात्री पटल्यास त्यांनी पुर्णपणे तेथे एक अध्यात्मीक केंद्र निर्माण करण्याचा संकल्प केला. व बाबांशी बोलल्यानंतर त्यांनी त्यास संमती दिली. आणि एका अभुतपुर्व अशा ऐतिहासिक भगवान गडाची कोणशिला निर्माण झाली. 1951 साली दसर्‍याच्या दिवशी शस्त्र पुजणांचा पहिला कार्यक्रम या डोंगरावर पार पडला. तेंव्हापासून आजपर्यंत दरवर्षी विजय दशमीला शस्त्र पुजन व सिमोलंगन करण्याची परंपरा सुरु झाली. ही परंपरा केवळ भक्तांच्या श्रद्धेतून सुरु झाली आहे. राजकीय वारसदारांच्या नाही हा विचार या निमित्ताने करण्याची वेळ आली आहे.

भगवान गड ही कोण एका जातीची, एका नेत्याची, एका पक्षाची अथवा कोणत्याही वारसदाराची खाजगी मालमत्ता नाही. तर आठरा पगड जातीच्या लोकांनी स्व: कष्टातून निर्माण केलेला तो सामाजिक व आध्यात्मिक भक्ती पिठाचा ठेवा आहे. सतत साथ वर्ष अथक परिश्रम करुन या डोंगरावर एक सुंदर दगडी बांधकाम करण्यात आलं त्याला मंदीराचा आकार देण्यात आला.  मंदीर पुर्ण झाले.या मंदीरात मुर्ती आल्याशिवाय देवपण येणार नाही आणि म्हणून तत्कालीन विधान सभेचे अध्यक्ष व बाबांचे परम भक्त जेष्ठ गांधीवाधी नेते बाळासाहेब भार्दे, यांनी विठ्ठलाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी बाबाकडे परवानगी मागितली. यासाठी कोण येणार याची चर्चा झाल्यावर तत्कालीन  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व राष्ट्रीय राजकारणातील सहयाद्री यशवंतराव चव्हाण यांना बोलवण्याचा व त्यांच्या हस्ते ही मुर्ती स्थापन करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला. 1958 ला लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी गडावर फक्त मुर्ती स्थापन केली नाही तर त्यांनी जाहीर केले. की आज पर्यंत धुम्या डोंगर म्हणून ओळखल्या जाणार्‍या या जागेला पुढे अनेक वर्ष , अनेक पिडया भगवानगड म्हणून ओळखतील तेंव्हा पासून हा परिसर तिर्थक्षेत्र भगवान गड म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यास यशस्वी झाला.

1965 ला पर्यंत दरवर्षी भगवान बाबांनी दसर्‍याच्या दिवशी शस्त्र पुजन व गावाच्या पायथ्या जवळील 25 गावातील लोकांना एकत्रीत करुन एक उत्सव सुरु केला. त्या उत्सवाचे रुपांतर म्हणजे आजचा दसरा मेळावा. बाबांच्या निधनानंतर त्यांच्या गाधीवर आलेल्या हरीभक्त परायण भिमसिंह बाबांनी ही परंपरा सतत 38 वर्ष अखंडपणे चालवली. परंतू भगवान बाबांच्या मुळ परंपरेत टप्या टप्याने बदल करत गेला. 1978 नंतर या भागात उस तोड कामगारांचे संघटन करणार्‍या व ती संघटना चालवणार्‍या माजी मंत्री बबनराव ढाकणे यांनी गडाच्या या उत्सवात लक्ष घातले. ऊसतोडायला जाण्यासाठी मजुरांची भरर्ती ही ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिण्यात असते. व याच दरम्यान हा मेळावा असल्याने कारखाल्याला जाण्यापुर्वी एक सामाजिक ऊत्सव करुन लोक कामासाठी जाण्याची परंपरा सुरु झाली.  ही परंपरा पुढे चालु असतांना राज्याच्या राजकारणात व ऊसतोड कामगारात मोठ्या प्रमाणात सामाजिक व राजकीय बदल झाले परिणामी वेगवेगळे नेते व कार्यकर्ते जन्माला आले. 1992 ला लोकनेते गोपीनाथ राव मुंडे हे राज्याच्या राजकारणात विरोधी पक्ष नेते म्हणून चर्चेत आले. त्यांनी स्वत:च्या वकृत्वाने व नेतृत्वाने सामाजिक प्रभाव निर्माण करण्यास सुरुवात केली.वर्षानु वर्षे नेतृत्वासाठी चाचपणत असलेल्या ऊसतोडणार्‍या कामगारा त्यांचा रुपाने एक नेतृत्व भेटले. याचा परिणाम आपल्या आयुष्यात काही तरी बदल घडेल या भावनेतून ऊस तोडणार्‍या सर्व लोकांच्या दृष्टीने मुंडे साहेब हे नेते बनले. मात्र राजकीय दृष्टया लोकनेते मुंडे साहेबांना हा पुर्ण समाज एकत्रीत आण्यात यश येत नव्हते. अशा वेळी 1993 ला बीड शहरात घडलेल्या काही सामाजिक व राजकीय घटनामुळे भगवान सेना या सामाजिक संघटनेची निर्मिती झाली.

क्रमशः....

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

सत्य असत्याशी मन केले ग्वाही.. मानियले नाही बहुमता


वारंवार धनंजय मुंडे साहेबांवर खलनायकीचे होणारे आरोप व त्यावरील निर्बुद्धीने केलेल्या प्रतिक्रिया या मला तर हास्यास्पद वाटतात.चला जरा जाणुन घेवु त्याबद्दल..

1-जे घरचे नाही झाले ते इतरांचे काय होणार? मला वाटत ह्या आरोपाचं खंडण तर साहेबांनी एक कर्तव्यनिष्ठ विरोधी पक्षनेता म्हणून केंव्हाच केलय. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सरकारदरबारी अभ्यासुपणे बाजु मांडून त्यांच निरसन होण्यासाठी सर्वतोपर प्रयत्न केलेले उभ्या महाराष्ट्राने पाहिलेत.त्यामुळे इतरांचे काय होणार? या टीकेला पुर्णविराम इथेच मिळेल.

2-उभ्या हयातीत गोपीनाथ मुंडे ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्या पुतण्याने त्या पवार कुटुंबाशीच हातमिळवणी केली. या टीकेलातर मुख्य प्रचारपद्धती वापरुन काही जणांनी आपल्या राजकीय झोळ्या भरल्या. असो या टीकेची गोष्ट अशीच झाली कि द्रोणाने एकलव्याला गुरुदक्षिणेत अंगठा मागणे.आज आपण सांविधानिक युगात वावरतोय.भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेली स्वातंत्र्ये हि धनंजय मुंडे साहेबांला देखील तितकीच लागु होतात जितकी त्यांवर आरोपांचे ताशेरे ओढणार्यांना होतात. साहेबांनी कुठल्या पक्षात राहुन त्यांच्या सामाजिक कार्याला वळण द्यावे हा त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा ठरतो. त्यात इतरांनी अनैतिक दखल देणे हे कितपत योग्य आहे.

कौटुंबिक सुखदुखाचे त्यांचे अधिकारांत इतरांनी राजकीय हव्यासापोटी व्यर्थ ढवळाढवळ करणे हि खेदात्मक गोष्टच मानावी लागेल. आज एक सांविधानिक पदावर कार्य करत असताना त्यांच्या कार्याची दखल संपुर्ण राज्याने घेतलीय. त्यामुळे निराकरण स्वतच प्रश्न न बनता त्यांच्या कार्यकर्तुत्वाला मान्य करणे हेच खरं जबाबी दायित्व होईल.सामाजिक मानसिकतेच्या बहुमताचंं पारडं त्यांच्याबाजुन आज कललेलं आहे केवळ राजकीय मतरुपी पारड्याची त्यात भरीची आवश्यकता आहे तेहि येणार्या काळात पहायला मिळेल.

- रा.उ.कदम (बीड) 

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

धनंजय मुंडे.. विरोधी पक्षातील कार्यकुशल नेतृत्व

या वर्षीचे पावसाळी अधिवेशन अनेक कारणाने गाजले या अधिवेशना मध्ये सरकाराच्या कारभार, सरकाराचे मंत्र्यांचे भ्रष्टाचार, पीकविमाच्या गोंधळ, शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण, अशा अनेक कारणाने सभागृह गाजले
       या अधिवेशनाच्या काळात एक नेता अशा होता जो हिरा सारख्या चमकत होता. तो नेता म्हणजे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते मा. धनंजय मुंडे साहेब जे शेतकय्राचे पश्र असे मांडत होते कि जणू सभागृहात एखाद्या
शेतकरी बोलत असावा. सरकाराच्या Digital India मध्ये पीकविमाच्या गोंधळ तर सर्वानी
पाहिला 31 जूलै नंतर 70% लोकांचे पीक विमा भरणा राहिला होता मा. साहेबांच्या प्रयत्नामूळे सरकारने 5 आँगस्ट पर्यंत मूदत
वाढवून दिली पण त्यात हि सरकाराचे शेतकरी विरोधी धोरण आडवे आले ते असो
सभागृहात विरोधक सभात्याग ( सभागृह सोडून जाताना आपण अनेकदा बघितले ) पण सत्ताधारी पक्षाला सभागृह सोडून जाण्याची महाराष्ट्राच्या ( किंवा भारताच्या ) इतिहासातील पहिलीच वेळ आहे. सरकार
वर हि वेळ फक्त आणि फक्त मा. धनंजय मुंडे साहेबांमूळेच आली. साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांची कशी दाणादाण उडताना संबध महाराष्ट्र पाहत होता.
‌                   महाराष्ट्रात काँग्रेस  पक्षाचे सूध्दा विरोधी पक्ष नेते आहेत पण त्यांचे नाव कुठे सूध्दा नसते. पण आदरणीय साहेबांच नाव
हे आख्या महाराष्ट्र भर गाजत आहे
तमाम महाराष्ट्र अधिवेशनाच्या काळात धनंजय मुंडे साहेब आज सभागृहात काय बोलले हे ऐकण्यासाठी उत्सूक असायचा.
 विरोधकांचा बुलंद आवाज
म्हणजेच  धनंजय मुंडे साहेब होय
‌विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना विधी मंडळात विरोधी पक्ष नेते नारायण राणे यांचा एक अभ्यासू विरोधक म्हणून सत्काराचा ठराव मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात मांडला होता,आणी तो एकमुखाने संमत होताना महाराष्ट्राने पाहिले आहे.अशाच तोडीचा एव्हाना त्यापेक्षाही कार्यकुशल  नेता राष्ट्रवादीला गवसला आहे.
हे राष्ट्रवादीचं भाग्य म्हणावे लागेल.

- बबलू आडसूळ,अंबाजोगाई (9860348087) 

धनंजय मुंडे.. "इरादे विराट" लोगो के "हृदय सम्राट"


     महाराष्ट्राच्या राजकारणात लोकांच्या हृदयाचे सम्राट म्हणून धनंजय मुंडे यांच्या कडे पाहिल जात आहे , कारण एकच लोकांचे कामे पूर्ण करण्याचे देह व उद्दिष्ट पूर्ण करणारा नेता म्हणजे धंनजय मुंडे ,
त्यांचे इरादे एखाद्या डोंगरा सारखे मोठे आणि विराट आहेत म्हणून धनंजय मुंडे हे नाव महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत खूप कमी काळात पोहचल , धनंजय मुंडे हे कुठल्याही समाजात दुजाभाव न करता प्रत्येक समान न्याय मिळावा या साठी आपला आवाज सरकार पर्यन्त पोहचवतात. 
धनंजय मुंडे यांचा सामान्य माणसाशी थेट संपर्क हाच त्यांचा महत्वाचा मुदा ठरतो म्हणून लोकांच्या मनात त्यांनी घर केलेले दिसून येत आहे .
मुंडे हे आता महाराष्ट्रात वेगळेच स्थान निर्माण केले आहे , मुंडे हे बीड जिल्ह्याची शान आहेतच पण आता हे नेत्रत्व मराठवाड्याची जान बनल आहे मुंडे हे विकासाचा झरा आणि राजकारणातील सापडलेला एक नवखा हिरा असे संबोधले जात आहे , मुंडे हे कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा स्रोत बनले आहेत कार्यकर्त्यांन त्यांच प्रत्येक वेळी मार्गदर्शन लाभत असत , आणि मुंबई हुन आढवड्यातून वेळ काडून परळी येथे दोन दिवस थांबणे आणि कारकर्त्यांच्या अडचणींवर काऱ्यवाही करणे व भेट म्हणजे कार्यकर्त्यांन साठी नवसंजीवनी असते .
महत्वाचं म्हणजे गोपीनाथ मुंडे या नावानंतर राजकीय जादूगार हे धनंजय मुंडे आहेत आशे भाकीत महाराष्ट्राच्या बड्या नेत्यांच्या वाणीतून बाहेर पडत आहे ,
स्वतःच्या करत्वने मिळवलेले विरोधी पक्ष नेते पद हे पद सध्याच्या परळी च्या आमदार यांना डोळ्यात टोचताना दिसतंय पण लाजवाब वकत्रत्वच्या जोरावर ढसा उमटवणारे कृतत्व हे धनंजय मुंडे यांच्या कडे दिसून येत आहे म्हणून त्यांची सर कोणालाच येणार नाही सध्या ते उत्तम प्रशासक व कुशाल संघटक करणारे महाराष्ट्रातले एकमेव नेते आहेत मुंडे हे  छ. शिवाजी महाराज , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , सावरकर , महात्मा फुले , मोठ्या थोर पुरुषांच्या व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विचारधारा वर चालणारे व पुरोगामी महाराष्ट्राची स्वप्न पूर्णकरणार हिऱ्या सारखं नेत्रत्व लाभले आहे म्हणून त्यांच्या प्रसिद्धीचा वेग हा एखाद्या सुसाट वाऱ्यासारखा आहे , 
त्यांच्या या स्वतःच्या जीवावर मिळवलेल्या प्रसिद्धीच्या वेगाला कोणीही रोकू शकत नाही आणि भविष्यात रोकन कठीन बनल आहे हे नकीच .
महाराष्ट्राच्या गोर गरीब व दिंनदुबळया जनतेसाठी मुंडे यांचा संघर्षयाचा प्रवास चालूच आहे आणि या प्रवासात कितीही खडतर वळणे आली तरी मुंडे हे पाठीमागे सरणारे नसून ते हा प्रवास योग्य व न्याय देऊन पूर्ण करतील व येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला पुरोगामी वळण देतील हे नकीच.....!!

- राम गित्ते (नंदागौळकर) मो नं. ७७२१०१६५८१

शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

धनंजय मुंडे.. सर्वगुणसंपन्न, अष्टपैलू नेतृत्व


माझ्या लेखाला हे शिर्षक द्यायचं कारणही तसंच आहे , आतापर्यंत महाराष्ट्रात वेगवेगळ्या नेतृत्वाचे वेगवेगळे कॅलिबर ( Quality ) आपण पाहिल्या असतील उदाहरणअर्थ पवार साहेबांची धूर्त नीती , बाळासाहेब ठाकरेंची आक्रमक शैली , गोपीनाथ मुंडेंचा लोकसंग्रह , प्रमोद महाजनांचे वक्तृत्व इत्यादी पण हे सर्व गुण एकाच नेतृत्वात असू शकतात का हो ? होय निश्चितच जर आपण आतापर्यंत धनंजय मुंडेंविषयी जाणून असाल त्यांना पाहून , ऐकून असाल तर हे तुम्हालाही मान्य असेल..
 तस पाहिलं तर धनंजय मुंडे हे चळवळीतून आलेले नेते आहेत, वयाच्या 18 व्या वर्षांपासून भाजपच्या विद्यार्थी आघाडीत ते सक्रिय झाले असले तरी धनंजय मुंडेंची राज्यव्यापी ओळख झाली ती डिसेंबर 2014 मध्ये विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यासच , त्यावेळी भरपूर राजकीय विश्लेषकानी त्यांची ही निवड केवळ त्यांच्या चुलत बहीण पंकजा मुंडेंना आव्हान एवढ्यातच तोलली पण डिसेंबर 2014 पासून आज ऑगस्ट 2017 ह्या जवळपास पावणेतीन वर्षांच्या कालावधीत धनंजय मुंडेंनी आपल्या सर्वगुणसंपन्न नेतृत्वाने ह्या सर्व बाजारबुणग्या विश्लेषकांची एकप्रकारे बोलतीच बंद केली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही..
कारण मागच्या पावणेतीन वर्षांच्या कालावधीत त्यांच्या विरोधी पक्षनेता ह्या पदाच्या कारकीर्दीकडे आपण जर निरखून पाहाल तर आपल्यालाही ते समजेल , पहिलीगोष्ट मुंडेसाहेब सभागृहात बोलताना कधीच पुराव्याशिवाय बोलत नाहीत, सभागृहाच्या आवारात नेहमी त्यांच्याकडे काही दस्तावेज आपन पाहिलात तर आपल्याला त्यांच्या अभ्यासूपणाच दर्शन होईल , सभागृहाच्या आत आपण त्यांचे भाषण ऐकाल तर आपल्याला त्यांच्या वक्ता ह्या गुणासोबतच आक्रमक आणि निर्भीड पणा दिसून येईल हे झाले विधिमंडळातील गुण..
विधिमंडळाच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही मुंडे साहेब गेले तर त्यांच्या आजूबाजूला जमत असलेल्या गर्दीवरून आपल्याक त्यांचा लोकसंग्रह लक्षात येईल..
राजकारण करत असताना नित्तीमतेसोबतच व्यवहारही चोक ठेवावे लागतात हे हि तितकेच खरे, त्यातही मुंडे साहेब तरबेज ,
ह्याच नुकतच उदाहरण म्हणजे 3 महिन्यांपूर्वी झालेली जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूकित बीड जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये असलेली प्रचंड प्रमाणातली गटबाजी ह्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले , मूळ वाद म्हणजे जेष्ठतेच्या तत्वानुसार बीड मध्ये धस आणि क्षीरसागर मुंडेंच नेतृत्व मान्य करायला तयार नव्हते , काहीही केलं तरी धनंजय मुंडेंना फक्त परळी लिमिटेड करायचं असा ह्यांचा डाव पण म्हणतात ना जातिवंत शिकार नेहमी योग्य वेळेच्या शोधात असतो हे काही खोट नाही , मुंडेंही एकप्रकारे राजकारणातले जातिवंत शिकारीच असल्याप्रमाणे ह्या वयस्कर मंडळींना कधी टिपायाचे हे ह्याची त्यांनी अत्यंत चोख अशी प्लॅनिंग केली ती जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत , ज्यामध्ये ह्या 2 नेतेमंडळींनी बंड करताच मुंडेंनी आपली म्यानातील तलवार बाहेर काढून एकप्रकारे ह्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शिरच्छेद केल्यासारखे पक्षातून बेधखल केले , आणि आष्टी आणि बीड मध्ये निर्माण झालेली पोकळी स्वतः सहित अमरसिंह पंडित आणि संदीप क्षीरसागरांच्या रूपाने भरून दाखवून आपल्यातील राजकीय धुर्तपणाच एकप्रकारे दर्शन सर्वांना घडवून आणलं.
          अश्याप्रकारे पवारसाहेब,    बाळासाहेब , प्रमोद जी महाजण आणि गोपीनाथ मुंडे साहेब ह्यांचा पंगतीत धनंजय मुंडेंना बसवण्याची घाई मी लगेच करणार नाही पण ह्या युवा नेतृत्वातले गुण त्यांना ह्या पंगतीत काय ह्यापेक्षा उपर घेऊन गेले तरी आश्चर्य वाटायचं काही कारण नाही..!!

अश्या सर्वगुणसंपन्न , अष्टपैलू नेतृत्वाला माझ्याकडून भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.

 - आदित्य मुंडे , पुणे

गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७

धनंजय मुंडे.. महाराष्ट्राच्या राजकारणातील "बाहुबली"


     आताच भारताच्या सिनेसृष्टी मध्ये एका हिंदी सिनेमाने धूम उडवली होती आणि त्या सिनेमाच नाव अगदि छोट्या मुलापासून ते प्रौढव्यक्ती पर्यन्त पोहचल होत त्या तील मुख्य भूमिका करणारा बाहुबली आपल्या गरीब लोकांच समाजाच साम्राज्य टिकवण्या साठी कुठल्याही संकटाना समोर जात असतो ,
सांगण्याच तात्पर्य एवढंच कि अगदी त्याचाच रिमेक संध्या महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात घडतोय आणि धनंजय मुंडे हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील बाहुबली म्हणून त्यांच्या कडे पाहिल जात आहे , जसे की माहिष्मती साम्राज्याठि बाहुबली प्रत्येक गोष्टीला आव्हान देत असतो आगदि त्याच प्रमाणे धनंजय धनंजय मुंडे सध्या महाराष्ट्रातील जनतेसाठी व गरीब लोकांच साम्राज्य टिकवण्यासाठी एखाद्या संघर्षयोध्या प्रमाणे गरीब जनतेसाठी अगदी चोवीस तास हाडाची काड करतायत .
विरोधकांना जरी बाहुबली हे गौरव उद्गार आयकायला आवडत नसतील तरी सामान्य जनता मात्र आपुलकीने व आवडीने म्हणत आहेत की मुंडे हेच सर्व सामान्य व पीडित जनतेचे बाहुबली आहेत
ज्या प्रमाणे बाहुबली या फिल्म मध्ये एका गीतात म्हंटल कि
   "जय जय कारा जय जय कारा
   स्वामी देना तुम साथ हामारा "
   आता सर्व सामान्य जनता या गीताची जोडणी मुंडे यांच्या नावाला जोडून करत आहेत                                  "जय जय कारा जय कारा
धनंजयजी तुम देना साथ हामारा"
मंग तो समाज कुठलाही असो मराठा समाज असेल किंवा सकल ओ बी सी समाज असेल
      आताच झालेल्या मुंबई मंधील मराठा क्रांती मोर्च्या मंध्ये कोटींच्या वर मराठा बांधव सहभागी झाले होते . मराठा बांधव आपल्या आश्या अंकांशया व अपेक्षा या सर्व गोष्टींचं ओझ घेऊन मुंबईत दाखल झाला पण या निरबुद्धी सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याच काम केल ना. धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाच्या मोर्च्यात सहभाग नोंदवून आपण मराठा समाजाच्या पत्येक मागणी साठी संघर्ष करत आहे हे त्यांनी दर्शवल आहे व मराठा समाजाची कोणतेही मगणी पूर्ण झाली नाही म्हणून त्यांनी सभात्याग केला व आणखी आपण पुढे मराठा समाजाचा साठी संघर्ष चालूच ठेऊ यांचे संकेत त्यांनी दिले ...!!
        धनंजय मुंडे यांनी नेहमीच सत्याला साथ आणि अन्ययाला लाथ हा बाना त्यांच्या नसानसात भरला गेलेला आहे .
         मुंडे यांचा प्रत्येक महाराष्ट्र वासीयान साठी लढा थांबणार नाही आणि धनंजय मुंडे यांच नेत्रत्व कधीही सरकार समोर झुकणार नाही हे पण तितकंच महत्वाचं म्हणावं लागेल .
         धनंजय मुंडे या नावाची दहशत सध्या सरकारच्या  प्रत्येक मंत्र्या मध्ये चालू आहे कारण भ्रष्ट मंत्र्यांना वठणीवर आणण्याचं काम हे फक्त धनंजय मुंडे हेच करू  शकतात कारण दोन मंत्र्यांची  पोल खोल हि मुंडे यांनी केली आहे त्या मुळे त्यांची मंत्री पदे धोक्यात येण्याची शक्यता आहे
         वरील सर्व जनहितार्थ व लोक कामांमुळे मुंडे यांचा चाहता वर्ग खूप जास्त प्रमाणात निर्माण झाला आहे म्हणून धनंजय मुंडे या नावाची ओळख तरुणाई मध्ये आहे आणि मुंडे हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील" बाहुबली " आहेत  असे गौरव उद्गार बाहेर पडत आहेत आणि ते थेट विरोधकांच्या कानावर जाऊन आदळत आहेत ज्या प्रमाणे बाहुबली सिनेमा मध्ये " सत्याला साथ आणि अन्ययाला लाथ " हे चित्र पाहायला मिळाले त्याचाच रिमेक धनंजय मुंडे यांच्यात पाहायला मिळत आहे ....!!!!

  - राम गित्ते (नंदागौळकर)  मो नं.७७२१०१६५८१

बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

धनंजय मुंडे..एक वादळ


     सध्या राज्याच्या राजकारणात धनंजय मुंडे नावाचं एक वादळ घोंगावतय आणि हे वादळ गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत हादरे देत आहे. २०१४ ला या देशात लाट आली आणि अनेकजण लाटेवर स्वार झाले. पण लाटेवर स्वार झालेल्यांचा निभाव आता वादळापुढे लागणार नाही. आता लाट ओसरली आहे आणि वादळ निर्माण झालेलं आहे. लाट वरून खाली आली होती, वादळ खालून वर चाललं आहे. लाटेच्या तडाख्यात अनेकांना घरी बसावं लागलं पण त्यांनी आता उभारी घेतली आहे. वादळाच्या तडाख्यात घरीच बसावं लागेल परत उभारी सुद्धा घेता येणार नाही. लाट २०१४ ला तयार झाली होती. पण वादळ हे २०१९ पूर्वीच तयार झालं आहे. आणि म्हणून २०१९ ला वादळा पुढे कुणाचाच टिकाव लागणार नाही.

विधानपरिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून ते आपली भूमिका चोखपणे बजावत आहेत. त्यांनी सरकार मधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे पुराव्यासहित बाहेर काढले. पण या मंत्र्यावर कारवाई करण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. पारदर्शक कारभाराचा बुरखा घालणार्‍या सरकारमधील अनेक मंत्र्यांनी करोडो रुपयांचे घोटाळे केले आहेत. तरीही सरकार पारदर्शकतेचा आव आणित आहे. मुंडेंनी या सरकारच्या पारदर्शकतेचा बुरखा टराटर फाडला आहे.

कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, संपूर्ण शेतकरी कर्जमाफी अशा एकना अनेक समाजहिताच्या मुद्यांवर आवाज उठविला. त्यांनी अतिशय प्रभाविपणे हे मुद्दे विधान परिषदेत मांडले यावर चर्चाही घडवून आणली. वेळोवेळी सरकारचे लक्षही वेधून घेतले पण गेंड्याच्या कातडीचं सरकार असल्यामुळे या सरकारने अजून यावर ठोस निर्णय घेतलेला नाही. मुंढेंनी सरकारला ठणकावून सांगितले आहे की, वरील मुद्यांवर आता चर्चा नको निर्णय घ्या निर्णय ..

 हे वादळ महाराष्ट्र तर काबीज करणारच आहे. पण दिल्ली सुद्धा हादरून सोडणार आहे. अशा अभ्यासू, हुशार, आक्रमक, समाजाप्रति तळमळ असणार्‍या वादळाची राष्ट्रवादीला आणि या महाराष्ट्राला नितांत गरज आहे. धनंजय मुंडे यांनी अल्पावधीतच महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेच्या मनात घर केलेलं आहे. धनंजय मुंडे हे विकासाचं वादळ आहे. आणि या वादळाचा झंझावात असाच सुरू राहिल, एवढं मात्र नक्की!

- अक्षय सोनवणे

रविवार, ६ ऑगस्ट, २०१७

धनंजय मुंडे- एक "राजकीय मीडिया किंग"

               
     पावसाळी आधिवेशना मुळे मुंबईतील राजकीय वातावरण पावसाळ्यातही गरम आहे पर्यावणाच्या बाजूने विचार केला तर मुंबई आधीच दमट आणि उष्ण आहे पण या उष्णतेत आणखी भर पडली आहे ती म्हणजे ना धनंजय मुंडे साहेबांनी या गरम अग्नीच्या झळा फक्त मुंबई पुरत्या राहिल्या नसून त्या झळा आता महाराष्ट्राच्या कानाकोपर्या पर्यन्त पोहचल्या आहेत महाराष्ट्राच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत " धनंजय मुंडे " यांनी आपल्या निर्भीड वक्ते पणामुळे आपली वेगळीच छाप पाडली आहे
सध्या न्यूज चॅनल वरती सर्वांची नजर पडतेय कारण मुंडे यांनी सभागृहात काय मुद्दे मांडले कोणाला पळून लावल कोणाला न्याय मिळवून दिला या कडे दररोज नजर जनतेची आहे .
महाराष्ट्राची जनता सध्या मनोरंजनात्मक टी  व्ही शो कडे पाट फिरवत आहेत आणि मुंडे यांची न्युज चॅनल वरती चरच्या सत्र खूप कुतूहलाने व आपल्या डोळ्याची पापणी खाली न पडू देता पाहत आहेत म्हणून लोकांच्या मनातून एकच शब्द बाहेर येत आहे सध्याचे "राजकीय मीडिया किंग " मुंडे हेच आहेत
लोकांच्या हातात रिमोटचे बटन ABP माझा, झी चोवीस तास , IBN लोकमत या चॅनल कडे वळण घेत आहेत .
 मंग चरच्या सत्र कुठल्याही विषयावर असो
 सध्या गाजत असलेल्या तथाकथित समृद्धी महामार्ग घोटाळा मंत्री प्रकाश मेहताचे SRA प्रकरण , पीकविमा भरण्यासाठी चालू असलेला गोंधळ आणि रत्नाकर गुटे यांच शेतकऱ्यांना फसवलेल प्रकरण इत्यादी गोष्टी आज धनंजय मुंडे यांनी लक्ष वेधी मध्ये मांडून सरकारला आकक्षरश्याह एका पायावर्ती उभा केले मुंडेंचा आक्रमक पवित्रा पाहून काही मंत्री मोहद्याना चरच्या बॉक्स मधून उठुन जायची वेळ आली .
      कालच्या पवार साहेबान वरील कवितेने तर महाराष्ट्रातील लोकांची तर साहेबानी मने जिंकली ती कविता शब्दात पुन्हा एखादा
      " मी ना पहिले शिवाजी ना ऐकले यशवंत
       साहेब सानिध्य लाभले , मी ची खरा भाग्यवंत तुम्हा मुले मिळे मजला जण दरबारी
       मान्यता तुंम्हा सवे तुम्हा सेवी , मानतो मी धन्यता शून्य होतो शून्य आहे मी
       तुम्हा विना पुण्य हे गतजन्मीचे , माना अथवा न माना !!!!!
       साहेबानी वरील ओळी कथन केल्या वरील कवितेच्या वाचना नंतर एवढंच लक्ष्यात येईल की मुंडे हे फक्त राजकीय पुरुष नसून त्यांच भाषा विष्यबद्दलच प्रेम आणि पुरोगामी महाराष्ट्राचे विचार त्यांच्या मनामनात रुजलेले आहेत आणि धनंजय मुंडे हे आम्हा कार्यकर्त्यांचे एक राजकीय व सांस्कृतिक " विद्यापीठ" आहेत...!!!!

   - राम गित्ते  (नंदागौळकर ) मो.न.- ७७२१०१६५८१

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

गोपीनाथराव मुंडे ते धनंजय मुंडे

गोपीनाथरावजी मुंडे यांच्या भांडवलरुपी उत्तराधिकारी पंकजा मुंडेच पण राजकीय संघर्षरुपी वारसदार मात्र धनंजय मुंडे साहेबच.. एका कणखर नेतृत्वाची  राजकीय दिशा हि पूर्वापार घडलेल्या घटनांवर अवलंबित्त असते. त्यातुन निर्माण झालेले वास्तव आणि त्याच्याकडे समाजाचा डोळसपणा हा त्या व्यक्तित्वाला न्याय देणारा ठरतो. या लेखात देखील त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही.

80 ते 90 च्या दशकात काँग्रेस च्या हाताचा पंजा लोकांच्या ह्रदयात होता अगदी रक्तात म्हणलात तरी चालेल मी 5 वर्षाचा असेल 91 ला. पण मला पक्क आठवत मी काँग्रेस चा झेंडा हातात घेऊन आमचा हाताचा पंजा म्हनून गावात फिरत होतो म्हणजे त्या वेळी काँग्रेस ची लोकप्रियता लोकां मध्ये अगदी लहान थोरा मध्ये किती भिनली  होती.... त्यातच इंदीरा गांधीं, राजीव गांधी यांच्या हत्येमुळं निर्माण झालेली प्रचंड सहानुभूती....त्यावेळी भाजप च कमळ म्हणलं कि पोटात कस तरीच होयच आपला हाताचा पंजाच बरा रे बाबा हि पहिली आणि शेवटची प्रतिक्रिया कोणाच्याही तोंडी असायची.... बिलकुल या प्रवाहाच्या विरोधात एक माणूस हि लाट शांत करत होता समाजाच्या मनावर बिंबून बसलेला हाताचा पंजा पुसण्याचा आपल्या अफाट जिद्द मेहनत आणि दुर्दम्य इच्छाशक्ती च्या जोरावर प्रयत्न करत होता त्यात समाजच मन वळवण्यात त्या माणसाला प्रचंड प्रमाणात यश आलं म्हणजे हाताचा पंजा सोडून दुसरं कोणतं चिन्ह ज्यांनी स्वप्नांत सुद्धा पाहिलं नसेल त्यांनी सुद्धा भाजप च कमळ स्वतःच्या मनावर कोरल ते फक्त एका व्यक्ती मूळ पर्यायानं समाजानं त्या व्यक्तीच नेत्रत्व निर्विवाद मान्य केलं आणि ती व्यक्ती होती स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब..!

      अगदी तीच परिस्थिती तसाच काळ तश्याच घटना तसाच एक लोकनेता आता आपलं स्वकर्तृत्व आणि अफाट मेहनत जिद्द या जोरावर संघर्ष करत आहे आणि त्या माणसाला आता भाजप च कमळ चिन्ह समाजाच्या मनावर जे बिंबून बसलंय ते पुसान्यात 70% यश आलंय..... आणि त्या माणसाच पुढच राजकीय भविष्य खूप उजवल आहे अगदी स्व.मुंडे साहेबासारखंच आतापर्यंत माझ्या सहीत सर्वच लोकांना जे चिन्ह एखादया शत्रू सारखं एखादा पापा सारखं वाटत होत तेच चिन्ह आज खूप प्रमाणात समाजानं स्वीकारलेलं दिसत आहे ह्याला फक्त एकच माणूस कारणीभूत आहे आणि त्या माणसाची मेहनत जिद्द... पर्यायानं समाज त्या माणसाच नेत्रत्व हळू हळू का होईना मान्य करत आहे. तो माणूस म्हणजे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते धनंजय_मुंडे
जो पक्ष जे चिन्ह आम्हाला अस्पसृश वाटत होत आज तेच आमची ओळख बनलंय हे फक्त धनंजय मुंडे यांच्यामुळंच...!
खरच धनुभाऊ तुम्ही ग्रेट आहात नक्कीच भविष्य तुमच्या यशापुढे लोटांगण घालत आहे.. आमचे स्व. मुंडे साहेब आम्हाला परत तुमच्या रूपाने मिळालेत...!!! 100% इतिहास परत त्याची पुनरावृत्ती करतो..!

 - नंदकिशोर मुंडे

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०१७

धनंजय मुंडे- चाहता महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा...!!!

सध्या राजकीय क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वसामान्य नेत्रत्वा बाबत आनेक तर्क वितर्क लावले जात आहेत कारण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली व अनअपेक्षित निधनानंतर सर्वसामान्य जनतेची धुरा कोण सांभाळणार यावर मोठ प्रश्न चिन्ह निर्माण झालं होत काही काळा पुरत  अनेक नावे चर्चेत आली पण  नावाला पण ब्रेक लागल व भा ज पा सरकार तर्फे आता सर्वसामान्य नेत्रत्व चा चेहरा पंकजाताई मुंडे यांच्या कडे दिला पण तो अल्पकाळापुरता राहिला व त्यांच्याच पक्षाने जनतेला दाखवुन दिल कि पंकजा मुंडे हे नेत्रत्व सक्षम पने करू शकत नाहीत म्हणून त्यांच्या कडून ओ बी सी मंत्रालय काढून घेऊन त्यांना घरचा आहेर दिला त्यानंतर सर्वसामान्य मराठवाड्यातील  जनतेची आशा आंकश्या कोण पूर्ण करणार या वर या  मोठ प्रश्नवाचक चिन्ह निर्माण झालं होत पण राजकीय क्षेत्रात एक चेहरा मराठवाड्यात बाकी होता राजकीय क्षेत्रातील त्यांचा अनुभव पाहता मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील ओ बी सी व सर्वसामान्य जनतेला नेत्रत्व मान्य असणार नाव म्हणजे ना धनंजय मुंडे हे नाव निर्भीड पने लोक सध्या त्यांच्या ओढातुन बाहेर पडत आहे असे सरळ पने दिसून येत आहे आता महाराष्ट्रातील जनतेला पण समजल कि वरील सर्व पर्याय संपल्या नंतर फक्त धनंजय मुंडे च निर्भीड पने विकासाची कार्यवाही करू शकतात ना कुणाचे दडपण व ना कुणाचा दबाव आशे एकमेव व्यक्तिस्वतत्र्य असलेले नेते म्हणजे ना धनंजय मुंडे साहेब हे नाव सध्या महाराष्ट्रातल जनतेच्या ओठातून पूर्ण महाराष्ट्रभर बाहेर पडत आहे सध्याची शेतकऱ्यांची परिस्थती लक्ष्यात घेता शेतकऱ्यावर गंभीर परिस्थती निर्माण झाली आहे .
          भा. ज .पा. सरकारने अगदी गाजवजात चालू केलेली प्रधानमंत्री फसल बिमा योजना हि फसलेली बिमा योजना आहे हे ना धनंजय मुंडे यांनी दाखून दिले आहे मागच्या पंधरा दिवसात शेतकरी नरक वासना भोगतयात कारण सरकार प्रत्येक दिवसाला हे सरकार रंग बदलू गिरगीटा सारख रंग बदलतंय पण या रंग बदलू गिरगीटाचा एकच रंग कायम ठेवण्या साठी धनंजय मुंडे हे नेत्रत्व सक्षम आहे हे त्यांनी खरीप हंगाम पीक विमा मुदत वाढवून घेऊन समदं महाराष्ट्राला दाखून दिल .
          पीक विम्याच्या मुदत वाठीबद्ल त्यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहून सरकारने त्यांच्या समोर नांगी टाकून दिली आणि पाच दिवसाची मुदत वाढ सरकारने दिली म्हणून आज धनंजय मुंडे साहेबान मुळे लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे आश्या जणहिता च्या कामामुळे सध्याच परळी मतदार संघाच्या मावळत नेत्रत्वला जनता योग्य ती जागा येणाऱ्या विधानसभा निवडणुकांन मध्ये दाखवेल यात शंका नाही . आताच पार पडलेल्या जि प व पंचायत समितीच्या निवडणुकांन मध्ये परळी मतदार संघाच्या जनतेनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मंत्री मोहद्याना दिवसा चांदणे दिसण्याची वेळ आली आहे .
     वरील कामांन मुळे धनंजय मुंडे हे नेते मराठवाड्याच नाहीत तर विदर्भ , खान्देश, पश्चिम महाराष्ट्र , कोकण , या कडे विस्तार होत आहे म्हणून ते महाराष्ट्राचे नेते आहेत हे दिसून येत आहे
      धनंजय मुंडे या नावाचा न थांबणार वादळ  रोकन कठीण बनल आहे आणि हे वादळ पूर्ण महाराष्ट्र भर नाही तर भविष्यात पूर्ण भारतभर गोंगावल्या शिवाय राहणार नाही.
   लेखणीच्या शेवटी जाताजाता एवढच निष्कर्ष काढेल कि धनंजय मुंडे यांची ताकद कुठल्याही शस्त्राच्या किंवा आस्त्राच्या जिवावर धजलेली नाही त्यांची क्रांती  लोकांच्या मनामंनात रुजलेली आहे.

- राम गित्ते (नंदागौळकर) मो नं : ७७२१०१६५८१

बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

धनंजय मुंडे - मरगळलेल्या विरोधकांतील बुलंद आवाज


विधान परिषदेच्या इतिहासात प्रथमच सत्ताधार्यांनी शोधली पळवाट..

आज विधान परिषदेचे कामकाज सुरु झालेकिच विरोधी पक्षनेते धनंजयजी मुंडे साहेबांनी सरकारला राज्यात सध्या गाजत असलेल्या तथाकथित समृद्धी महामार्ग घोटाळा, मंत्री प्रकाश मेहतांचे SRA प्रकरण , पीकविमा भरण्यासाठी चालू असलेला गोंधळ आणि रत्नाकर गुट्टे च शेतकऱ्यांना फसविलेले प्रकरण इत्यादी गोष्टी आज साहेबांनी लक्षवेधी मध्ये मांडून सरकारला अक्षरशः झोडपुन काढले ,साहेबांचा आक्रमकपणा पाहून सरकारमधील सर्व प्रतिनिधी अक्षरशः सभागृहातून उठून पळाले.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना विधी मंडळात विरोधी पक्ष नेते नारायण राणे यांचा एक अभ्यासू विरोधक म्हणून सत्काराचा ठराव मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात मांडला होता,आणी तो एकमुखाने संमत होताना महाराष्ट्राने पाहिले आहे.अशाच तोडीचा विरोधी पक्षनेता म्हणून धनंजय मुंडे नावाचा अभ्यासू नेता विरोधकांना गवसला आहे.विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांना निशब्द करून सदन सोडायला लावणारा नेता म्हणून धनंजय मुंडेंची नोंद  इतिहासात घेतली जाणार.आक्रमक भाषेला अभ्यासाची जोड देऊन संयत भाषेत सवाल उपस्थित करण्याची किमया धनंजय मुंडेंना अवगत आहे.याचा प्रत्यय अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांच्यात झालेल्या खडाजंगीत आली होती.तेव्हा मुख्यमंत्र्यांना गप बसावे लागले होते, आणि याच किमयाच्या जोरावर आज सत्ताधाऱ्यांचे दात त्यांच्याच  घशात घातले.
भाजप मध्ये असताना कदाचित याच टॅलेंटची कदर झाली नाही,इकडे एक संधी मिळाली.आणि संधीचा वारू इतका उधळला की यांच्या भाषणाने परिषद अवाक झाली. विशेष म्हणजे  स्वतःच्या जातीपलीकडे विचार करून सर्वसमावेशक भूमिका घेऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा परिषदेत वाचा फोडली.हे वैशिष्ट्यगुण येत्या काळात धनंजय मुंडे राज्याचा नेता होण्यास पूरक ठरतील.विरोधक जेव्हा सत्तेत जातात तेव्हा ते विरोधक असतानाचा आव विसरत नाही याचे बरेचसे उदाहरण सध्या दिसतील.पण मला खात्री आहे की धनंजय मुंडे यांच्याबद्दल असे होणार नाही.जेवढे विरोधक म्हणून ते सध्या कारकीर्द गाजवत आहे , तितकेच ते सत्तेत आल्यावर देखील लोकांचे तत्परतेने काम करतील.
तूर्तास आज तरी धनंजय मुंडेंनी इतिहास घडविला आहे.त्यांना शुभेच्छा .

- प्रतिक शिवाजीराव पाटील

मंगळवार, १ ऑगस्ट, २०१७

महाराष्ट्राचा उगवता सूर्य

                 धनंजय मुंडे हे नाव कानावर पडताच हिमलयातुन सूर्य उगवत  असताना सूर्यकिरणांची चोहिकडे जाशी लालिमा पसरते तसे  अष्टपैलू व्यक्तिमत्व घेवून सहेबच जणू आपल्या डोळ्यांसमोर  प्रत्यक्ष उभे राहतात.
           धनंजय मुंडे, आदरणीय पंडितआण्णा व रुक्मिणिबाई मुंडे यांच्या पोटी 15 जुलै 1975 रोजी जन्माला आलेले पुत्ररत्न .सहेबांचे बालपन नाथरा व परळीमधेच गेले त्यामुळे त्यांची नाळ परळीशी जोडली गेलेली आहे.सहेबांचे प्राथमिक शिक्षण परळीतील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये झाले.महाविद्यालयीन शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालय आणि त्यानंतर पदविचे शिक्षण (बॅचलर ऑफ सोशल लॉ) पुणे येथील सिम्बॉयसिस कॉलेजमधे पूर्ण केले.कॉलेज वयात असतानापसुनाची समजप्रतिची अपुलकिचि भावना यातून साहेब जवळपास 25 वर्षापासून परळीतिल आपल्या बांधावांसाठी काम करत आहेत.समजाप्रती आपले काही देने लागते या भावनेतुन समाजकार्य करण्यासाठी त्यांनी नाथ प्रतिष्ठानची स्थापना केली व आजपर्यंत विविध धर्मातील 1000 बहिणींचे लग्न लावून दिले. त्यामुळे त्यांना 1000 बहिणींचा भाऊ असे संबोधले जाते.फक्त राजकीयच नाही तर सामाजिक,सांस्कृतिक,क्रीडा असे कुठलेहि क्षेत्र त्यांनी सोडले नाही.स्वामी विवेकानंद क्रीडा प्रसारक मंडळाची स्थापना करून त्यांनी युवकांना प्रोत्साहित करण्याचे कम केले.याची दखल घेवून 2003 साली सहेबांची केंद्र सरकारच्या क्रीड़ा मंत्रायलच्या वतीने दिल्ली येथे आयोजित ऑटो एशियन गेम्स च्या संयोजन समितिवर निवड केलि गेली.शिक्षण क्षेत्रताहि त्यांनी नाथ शिक्षण संस्थेच्या रूपाने छोटेसे रोपटे लावले आहे त्याचेही भल्या मोठ्या वृक्षात नक्कीच रूपांतर होईल.
         राजकीय क्षेत्रातही त्यांनी पूर्वीपासूनच चांगला ठसा उमतवलेला आहे. 1995 च्या  विधानसभा निवडणुकीपासून सहेबांनी प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेतला.1997-98 साली भा. ज.यु. मो. विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रमुख हे पद त्यांनी भूषविले.18 फेब्रुवारी 2002 साली बीड जि. प. च्या पट्टीवडगाव गटातुन 300 मतानी विजयी झाले.त्यानंतर त्याच गटातुन 2007 साली तब्बल 1800 मतानी त्यांचा विजय झाला तेंव्हा त्यांची निवड बीड जि. प. उपाध्यक्षपदि करण्यात आली.या काळात त्यांनी जिल्ह्याच्या विकसासाठी कोटयावधी रुपयांचा निधि आणून विकासकामे केली. त्यानंतर 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी जाहिर केलि पण काही कारणामुळे ति डावलन्यात आली.त्यानंतर 10 जून 2010 साली त्यांची वर्णी विधानपरिषदेवर लागली.जुलै 2013 मध्ये त्यांनी भा. ज.पा. विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला व राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे निवडणूक लढवली व ते निवडून आले.विधानपरिषद सदस्य म्हणून काम करताना सभागृहात संपूर्ण राज्यभरातील  विविध प्रश्नांवर आवाज उठवला.याच काळात परळी मतदार संघात 150 कोटींची विकसकामे केली.2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला खरा पण म्हणतात न "जो होता है अच्छे के लिये होता है" याची प्रचिती जनतेला झाली.सहेबांची कार्यक्षमता पाहून डिसेंबर 2014 मध्ये शरद पवार यांनी विधान परिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदाची जबाबदारी सहेबांवर सोपावली व सर्वात तरुण विरोधीपक्ष नेता असा बहुमान त्यांना मिळाला.या पदाची जबाबदारी ओळखून त्यांनी आपले कार्य अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले. राज्यसरकारच्या विविध खात्यांत झालेल्या अपहराबद्दलची पुरव्यानिशि व मुद्देसूद मांडणी मग तो चिक्की घोटाळा असो ,महापुरुषांच्या प्रतिमा खरेदी घोटाळा असो वा औषध घोटाळा असो सर्व अपहारांची सभागृहात मांडणी केली. या काळात लोकांना कळले की, विधानसभेशिवाय विधानपरिषद हे ही एक सभागृह आहे.आज विधानपरिषद म्हंटल की,लोक म्हणतात धनंजय मुंडे वि. प. नेते आहेत तेच न ते सभागृह? तेंव्हा आम्ही कार्यकर्ते पण गर्वाने सांगतो की हो तेच ते सभागृह.आशा प्रकारे कमी काळातच साहेब महाराष्ट्राच्या जनतेच्या विश्वासास पात्र ठरले त्यामुळे परत 2016 साली विधानपरिषदेची उमेदवारी शरद पवर सहेबांनी धनंजय मुंडे सहेबांना दिली व साहेब कर्तृत्वाच्या जोरावर बिनविरोध निवडून विधानपरिषदेवर गेले.
  मतदार संघातील असो अथवा बहेरचा सहेबांकडे मदत मागायला गेला तर त्याला मदत नक्कीच मिळते. हळू हळू का होईना धनंजय नावाचे वारे सर्वत्र वाहु लागले आहे,तसेच लोकांचा विश्वासही त्यांनी संपादन केला आहे व त्या विश्वासास साहेब तडा जाऊ देणार नाहीत असा विश्वास आहे.
       
 - महेश गोविंद मुंडे, शिवाजीनगर परळी वै.

शनिवार, २९ जुलै, २०१७

अन्याय कि गद्दारी..भाग-2

स्व.मुंडे साहेबांनी आदेश दिला सर्व कार्यकर्ते आणि परळीकर खुश होते. धनुभाऊ हे तर पूर्ण ताकदीनिशी कामाला लागले होते रोज कमीत कमी 5 गावच्या लोकांच्या गाठीभेटी घेऊन अडीअडचणी सोडवल्या शिवाय घरी येत नव्हते. आणि घरी येऊन सुद्धा बाहेर गावावरून आलेल्या लोकांच्या अडचणी अगदी आमदार म्हणूनच सोडवत होते.
त्या वेळचा एक प्रसंग आठवला ज्या ठिकाणी सभा आहे त्या प्रत्येक सभेत सूत्रसंचलन करणारी व्यक्ती धनुभाऊच स्वागत 288 आमदारा पैकी सर्वात तरुण तडफदार अभ्यासू आमदार अश्या उल्लेखाने करत असे.
तर त्यावर धनुभाऊच उत्तर असायचं मी अजून आमदार झालो नाही पण 50 आमदारांची ताकद माझ्यात आहे..!
कदाचित नियती पुढं काय करील याची चुणूक लागली असेल त्यांना.
इकडे मतदारसंघात हा माणूस अगदी जिवाच रान करत रात्रीचा दिवस अन दिवसाची रात्र करून अगदीच तन, मन,धनाने सर्व जनतेसमोर जात होता आणि तिकडे मुंबईत परळीतिलच काही पांढरपेशी लोक ज्यांना फक्त साहेबांकडून आयते गबाळ हाणण्यात इंट्रेस होता असे पांढरपेशी लोक धनंजय मुंडे च्या विरोधात स्व मुंडे साहेबांचे कान भरवत होती पर्यायाने साहेबांच्या आदेशाची आणि धनंजय मुंडे च्या स्वप्नाची चिता तयार करत होती.
2009विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली होती सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले होते त्यात त्या बातम्या कानावर येऊन गेल्या होत्या पक्ष्याची पहिली यादी प्रसिद्ध झाली त्यात धनुभाऊ च नाव नव्हते तिथंच मनात संशयाची पाल चुकचुकली होती पण शेवट पर्यंत आपलं नाव येईल असं वाटत होत. अंतिम यादिला अवघे 2 दिवस उरले होते यादी प्रसिद्ध झाली आणि परळी चा उमेदवार धनंजय मुंडे नसून पंकजा ताई आहेत हे कळलं त्यावेळी कोणालाही ऐनवेळी नाव बदलण्यात आलंय हा विश्वासच बसत नव्हता कारण की ना कुठली मागणी न चर्चा न काम म्हणून जो तो म्हणत होता हि फेक न्यूज आहे पण तीच खरी न्यूज होती...! काही मोजक्या पांढरपेशी लोकांच्या म्हणण्यावरून धनंजयमुंडे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती...!
लगेचच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी व तेव्हा चे (युवा मोर्च्या प्रमुख)निळूभाऊ नि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्व.मुंडे साहेब स्व.पंडित आंण्णा आणि खुद्द धनंजय_मुंडे यांच्या भागवत मंगल कार्यालय येथे बैठकीचे आयोजन केलं होतं त्यात सर्वांनी एकमुखाने स्व.मुंडे साहेबांना उमेदवारीचा फेरविचार करून धनंजय मुंडे यांना उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणी केली होती पण ती सर्व कार्यकर्त्यांची मागणी सुद्धा त्यावेळी कामाला आली नाही..!
विषय तो नव्हताच की ताईंना उमेदवारी का दिली..!
विषय होता तो 6 महिन्याने आधी आदेश देऊन आशेला लावून धनंजय मुंडे ना मतदारसंघ पिंजून काढायला लावायला नाही पाहिजे होता आणी धनंजय मुंडे हे लोकांसमोर आमदार म्हणूनच गेलेले होते तर तो त्यांचा जनतेत किती मोठा अपमान होता हस झालं होतं जिकड तिकडं सर्वांचेच...! धनंजय_मुंडे ची आशामोड झाली होती.!
सर्व कार्यकर्ते नाराज निराश झालेले असताना त्यांच्यात नवा जोश भरून त्यांना नाही नाही तसल्या शपथा घालून हि निवडणूक जर आपण काही भलं बुर कराल तर त्याचा शिक्का आयुष्यभर माझ्या कपाळी बसेल म्हणून सर्व कार्यकर्त्याना कामाला लावले..!
एवढं सगळं होऊनही एवढी निराशा आशामोड अपमान होऊनही कसलीही निराशा नाराजी न दाखवता धनंजय नावाच्या वाघान पंकजा ताई च्या निवडणुकीची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन ताईचा विजय सुकर केला आणि 36000 हजारांनी ताईचा विजय झाला..!

- नंदकिशोर मुंडे ( संग्रहित लेख ) 

अन्याय कि गद्दारी..भाग-1

2009 च्या उन्हाळ्यात स्व. मुंडे साहेबांची संघर्षयात्रा परळीत येणार होती माझ्यासारखे नवखे आणि जुने सवंगडी घेऊन धनुभाऊ संघर्ष यात्रेच्या सभेची तयारी 4 दिवसा पासून करत होते..
साहेबांना स्टेज असं लागत रे, साहेबानां उघड्या टफाच्या व्हँन मध्ये थर्मल पासून आपल्याला वाजत गाजत आणायचं रे, साहेबांना भरजरी फेटा असा घ्या रे , 5000 पोर घेऊन गाड्यांची रॅली आपल्याला परळी च्या हद्दी पासून काढायची आहे ते कुठले कुठले ते अश्या खूप छोट्या छोट्या गोष्टी वर लक्ष देऊन हा माणूस 4 दिवस बरोबर झोपला सुद्धा नव्हता... जणू परळीत वारकऱ्यांचा विठ्ठलच येणार असं धनुभाऊ च्या मेहनती तुन दिसत होतं काय ते प्रेम किती असावं साहेबांवर धनुभाउंच जणू आपला प्रियकर पहिल्यांदा प्रेयसी ला भेटायला येणार आणि त्या प्रेयसी ची जी तळमळ होते अगदी तशीच तळमळ होती.
तो दिवस उजाडला सकाळी इटके कॉर्नर मा. निळूभाऊ चाटे यांच्या नेत्रत्वाखाली गाड्यांची रॅली होती त्यांनी सर्व व्यवस्था करून ठेवली होती धनुभाऊ आले आणि 5000 पोरांची रॅली गँगखेड परळी हद्दीपर्यंत जाऊन पोहचली...... साहेब येणार म्हणून सर्व तरुणांमध्ये जोश होता साहेब संध्याकाळी 5 ला आले त्यांच्यासोबत गाडीत मा. एकनाथ खडसे मा.पांडुरंग पुंडकर हे होते पुढं गाड्यांची रॅली घोषणा साहेबांचा जयघोष एकदम पुढच्या गाडीवर धनुभाऊ हे होतो सर्व परिसर साहेब मय झाला होता...
साहेबांची रॅली सभेच्या ठिकाणी पोहोचली
(तोतला मैदान) सर्व मान्यवर व्यासपीठा वर विराजमान झाले मान्यवर सरकार वर आसूड ओढत होते आपल्या भाषण शैली तून सरकारचा समाचार घेत होते पण माझ्या सहीत सर्व सभेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या परळीकरांना उत्सुकता होती ती साहेब कधी बोलतील आणि कधी आम्हाला आमच्या नेत्याला आदेश देतील...होय..आदेश कारण की 6 महिन्यावर विधानसभा होती साहेब भाषणाला उठले आपल्या स्टाईल मध्ये नाकाला अंगठ्याने झटका दिला आणि माईक खाली सरकवला बोलायला सुरुवात केली त्यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला शेतकऱ्यांची व्यथा आपल्या भाषणात मांडली आणि ती वेळ आली आम्ही ज्याची वाट पाहत होतो साहेबांनी स्टेजवरच कोपऱ्यात उभ्या असलेल्या धनुभाऊ कडे पाहिलं आणि म्हणले धनंजय खूप छान नियोजन केलंस सभेचे.... एवढे युवक इतके लोक शिस्तबद्ध नियोजन केलंस आता माझ्या जागी यायला तू समर्थ झालास "धनंजय विधानसभेच्या तयारीला लाग पुढचा परळीचा आमदार तूच आहेस"...प्रचंड टाळ्या शिट्ट्या..
(या घटने चा साक्षीदार मी व सर्व परळी कर आहेत).

क्रमश... 

शरद पवार : महाराष्ट्राचा अर्धशतकाचा इतिहास..भाग-2

साहित्यिक, लेखक, विविध विषयांतील तज्ज्ञ यांच्यासोबत ते नेहमीच वावरताना दिसतात. मी राज्याचा शिक्षणमंत्री असताना मला त्यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत होते. शिक्षण क्षेत्रात काय नवीन केले पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असे, त्यासाठी ते आमच्यासोबत अनेक बैठकी घ्यायचे. गोविंदभाई श्रॉफांसारखे आंदोलक, अनंत भालेरावांसारखे कठोर पण चोखंदळ टीकाकार, बापू काळदात्यांसारखे समाजवादी नेते यांनाही ते सदैव आपले वाटले. हमीद दलवाईसारख्या क्रांतिकारी कार्यकर्त्याला त्याच्या अखेरच्या काळात आपल्या घरी आश्रय देऊनही महाराष्ट्रातील अल्पसंख्य समाजाशी पवारांना आत्मीयतेचे संबंध राखता आले.
नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्याशी त्यांना एकाचवेळी मैत्र राखता येते, बाळासाहेब ठाकरे आणि फारुख अब्दुल्ला ही त्यांच्या परिवारातली माणसे असतात. इंदिराजी, राजीवजी, नरसिंहराव आणि डॉ.मनमोहनसिंग यांच्या सत्ताकाळात पवार त्यांचे सहकारी राहिले. मात्र त्यांना मिळालेला बहुमान त्यांच्या सत्तापदाचा नाही, त्यांना मिळालेल्या पद्मविभूषण या किताबाचाही नाही, तो त्यांना मिळालेल्या लोकमान्यतेचा आहे. साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा अशी सगळी क्षेत्रे नुसती व्यापण्याचाच नव्हे तर प्रसंगी मार्गदर्शन करण्याचा अधिकारही त्यांना प्राप्त आहे.
लो. टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद अमृत डांगे, एसेम जोशी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पश्चात महाराष्ट्राला लाभलेला सर्वात मोठ्या उंचीचा व प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचा हा नेता त्यांच्या राजकीय आयुष्याचे अर्धशतक पूर्ण करतो तेव्हा तो केवळ महाराष्ट्राचा नेता, मुख्यमंत्री वा मार्गदर्शकच राहत नाही, तो त्याच्या अर्धशतकाच्या इतिहासाचा निर्माताही झालेला असतो.

- राजेंद्र दर्डा (लोकमत एडिटर इन चीफ) 

शरद पवार : महाराष्ट्राचा अर्धशतकाचा इतिहास..भाग-1

अविचल मूल्यनिष्ठा व व्यावहारिक लवचिकता, वैचारिक दुरावा व व्यक्तिगत ममत्व, सत्तायोग व सेवाधर्म यासोबतच प्रादेशिकता व राष्ट्रीयत्व या वैशिष्ट्यांवर हक्क सांगणारा शरद पवाराजींएवढा उंचीचा व मान्यतेचा दुसरा नेता आज महाराष्ट्रात नाही. लोकप्रियता आणि लोकक्षोभ यातून सुखावून आणि सलाखून निघालेला तसा सर्वमान्य पुढारीही महाराष्ट्रात  कोणी नाही.
शेतकरी कामगार पक्षाच्या डाव्या वैचारिक परंपरेचा कुटुंबातून मिळालेला वारसा, यशवंतराव चव्हाणांसारख्या प्रगल्भ मार्गदर्शकाचा राजकीय संस्कार, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा मनोमन केलेला अंगीकार आणि राजकारणातील केवढ्याही मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्याची आणि त्यातली कोणतीही जबाबदारी समर्थपणे पेलून धरण्याची क्षमता जपणाºया शरद पवारांना स्वपक्षाएवढीच विपक्षातही मान्यता आहे.
५० वर्षांच्या राजकीय व वैधानिक आयुष्यात त्यांच्या वाट्याला अनेक मोठी व महत्त्वाची पदे आली. देवदुर्लभ सन्मान आले, कोणत्याही मान्यताप्राप्त पुढाºयाच्या वाट्याला येऊ नये अशी टीकाही आली. पण प्रशंसेच्या हारांनी ते कधी भारावले नाहीत आणि टीकेच्या प्रहारांनीही ते कधी डगमगले नाहीत. आयुष्य आणि अनुभव, काळ आणि त्यासोबत बदलत जाणारे समाजाचे प्रश्न या साºयांकडे कमालीच्या विधायक दृष्टीने पाहत त्यांनी राज्याचे व समाजाचे नेतृत्व केले.
युवक काँग्रेसचे जिल्हा पातळीवर नेतृत्व करीत असतानाच आपल्या क्षेत्रातील सव्वाशेहून अधिक खेड्यांना सिंचनक्षमता प्राप्त करून देणारा हा तरुण नेता साºया महाराष्ट्राची तशीच सेवा करताना आयुष्यभर आढळला.
चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर १९९४ साली मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे केले. त्यासाठी १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना व त्यांच्या पक्षाला त्याची किंमतही मोजावी लागली. पण, सामाजिकदृष्ट्या पवार साहेबांनी आपल्या धोरणाशी प्रामाणिक राहून नामांतराचा विषय मार्गी लावला. सभोवती मृत्यूचे थैमान असताना शेकडो प्रेतांच्या मध्यभागी सारे प्रदूषण अनुभवतच त्यांनी लातूरच्या भूकंपग्रस्तांना दिलासा दिला. आपल्या मनाचा थांग लागू न देता समोरच्याला आपलेसे करून घेण्याची त्यांची वृत्ती अनुकरणीय आहे. सोबतच्या विश्वासू माणसांना जपत असतानाच आपल्या विश्वासाला धक्का लावणाºया माणसांना खड्यासारखे दूर करण्याची त्यांची तटस्थताही विलक्षण आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या चार कारकिर्दी यशस्वी करणाºया पवारांनी केंद्रातील संरक्षण व कृषी ही दोन्ही महत्त्वाची व संवेदनशील खाती राबविली. लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेतेपदही त्यांनी समर्थपणे अनुभवले. काँग्रेस या मातृपक्षापासून वेगळे होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला व तो एकहाती वाढवून राज्यव्यापी केला. ते करताना आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी बळ व साधने पुरविली आणि प्रसंगी ते त्यांच्या मागे सर्वशक्तिनिशी उभे राहिले. हे राजकारण करीत असतानाच महाराष्ट्राच्या विकासावरील त्यांचे लक्ष कधी विचलित झाले नाही. येथील सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, ग्रामीण भागातील लघुउद्योग आणि सुखसोई याबाबतचा त्यांचा आग्रह पूर्वीएवढाच आजही कायम आहे. शेतकºयांच्या उत्पादनाला न्याय्य भाव मिळावा आणि ग्रामीण भागातील माणूस समाजाच्या इतर वर्गांसोबत बरोबरीच्या नात्याने उभा राहावा हे त्यांचे स्वप्नही त्यांनी कधी नजरेआड होऊ दिले नाही. मुंबईपासून गडचिरोलीपर्यंतच्या प्रत्येकच क्षेत्राची गरज समजून घेऊन ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारे पवारांचे नेतृत्व महाराष्ट्रासाठी वरदान ठरले आहे. त्यांच्याशी अनेकांनी वैर केले, त्यांना जिव्हारी लागेल अशी टीकाही त्यांच्यावर केली, अविश्वसनीयतेपासून साºयांना संभ्रमात ठेवणारा नेता अशी टीकाही त्यांनी अनुभवली. मात्र विकासावर लक्ष केंद्रित केलेल्या या नेत्याचा संयम त्यातल्या कशानेही ढळलेला कुणाला दिसला नाही.
पवारांनी मराठवाड्यासाठी केलेले काम या प्रदेशाला समृद्धी व संपन्नतेएवढेच सामाजिक स्वास्थ्य देऊन गेले आहे. येथील अनेक वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये त्यांच्याच प्रयत्न व प्रेरणांनी येथे उभी राहिली. शिक्षण व संस्कृतीची आज जी विविध दालने येथे खुली झाली त्यांचेही श्रेय खºया अर्थाने पवारांकडेच जाणारे आहे. औरंगाबाद-वाळुज ही महत्त्वपूर्ण औद्योगिक वसाहत त्यांच्याच प्रयत्नांतून उभी राहिली. मला आठवतं, त्यावेळी राज्याचे उद्योगमंत्री होते माझे वडील जवाहरलालजी दर्डा. पवारसाहेब साहेबांएवढा प्रचंड मेहनत घेणारा दुसरा कुणी राजकारणी महाराष्ट्रात आहे असं मला वाटत नाही.

क्रमश.... 

शुक्रवार, २८ जुलै, २०१७

"चाल दोस्ता तुला "मराठवाडा" दाखवतो "



मराठवाड्यातल्या शेतकर्यावर सततची निसर्गाची होणारी अवकृपा व त्यातुन निर्माण होणारे
भयाण वास्तव याचं विवेचन करणारी एका लेखकाची सत्यकविता... 


चाल दोस्ता तुला "मराठवाडा" दाखवतो..
काळ्या आईच्या पोटात खुडलेला कोवळा गर्भ दाखवतो,
चाल दोस्ता तुला "मराठवाडा" दाखवतो..

कोरडा डोळा , कोरडी विहीर,
कोरड्या राजकारण्यांचे ,कोरडे संदर्भ दाखवतो,
चाल दोस्ता तुला "मराठवाडा" दाखवतो..

वावरात शेतकऱ्याची सत्ता नाही,
विहिरीत पाण्याचा पत्ता नाही,
पाच वर्षा पासुन, कनेक्शन साठी केलेला अर्ज दाखवतो,
चाल दोस्ता तुला "मराठवाडा" दाखवतो..

या वर्षी वावरात, पिकांची शाळाच नाही डवरली,
कि निसर्गानं वावराची, फी च नाही भरली,
अनुपस्थित पिकांचा, सुनसान वर्ग दाखवतो,
चाल दोस्ता तुला "मराठवाडा" दाखवतो..

बिजवाई घेतली तं,खताची असते उधारी,
पोराला शिकोलं तं ,पोरगी राह्यते कोरी,
दुःखाचा तं उकळा रोज ,सुख वर्ज्य दाखवतो,
चाल दोस्ता तुला "मराठवाडा" दाखवतो..

असे उसने आयुष्य जगण्याचा, फायदा तरी काय,
एंड्रिन च्या दुकानाकडे , आपोआप वळतात मग पाय,
जहर खाण्यासाठीही ,काढलेलं कर्ज दाखवतो,
चाल दोस्ता तुला "मराठवाडा" दाखवतो..

योजना नको सांत्वन नको ,नकोच करू हाऊस,
देवा तू फक्त वेळेवर, पाडत जा पाऊस,
माझ्या डोळ्यात लपवलेला मग, निसर्ग दाखवतो,
चाल दोस्ता तुला "मराठवाडा" दाखवतो...

-संग्रहीत कविता (लेखकाचे नाव आजतागायत कळालेलं नाही) 

शुक्रवार, २१ जुलै, २०१७

बालाघाटच्या डोंगर रांगेतील उगवता सूर्य



               बालाघाट म्हंटल कि आठवतो तो संघर्षशील लोकांचा मराठवाडा मागच्या दोन ते तीन वर्षात बालाघाट डोंगरी पट्यात राहणाऱ्या लोंकाना जास्तीचाच संघर्ष करावा लागलाय कारण सततचा दुष्काळ आणि नापिकी त्यामुळे येथील लोकांना जगन कठीन बनलं पण त्या दुष्काळ परिस्थिती मध्ये बालाघाटच्या डोंगर रांगातून उगवला एक सूर्य आणि आशेचा किरण ते म्हणजे धनंजय मुंडे साहेब, साहेबांच्या रूपाने आणि शेतकऱ्यांना कुठे तरी वाटायला लागलं की आपल्याला हा माणूस न्याय मिळवून  देऊ शकतो 
निसर्गाने जरी या भागाशी भेदभाव केलेला असला तरी साहेबांच्या रूपाने एक बदल घडवून इच्छिणारे मसिहा आपणास पाहावयास मिळत आहे येथील परिस्थितीवर मांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या फोल असणाऱ्या समीकरनाना तोडीस जबाब देणारा विरोधक म्हणजे ना धनंजय मुंडे हे नाव दुष्काळी परिस्थिती जनावरानच्या चाऱ्याचे होणारे हाल पाहून त्यांच्या चाऱ्याची सोय करणाऱ्या छावणी पुरुषास दाद द्यायला हवी. .
त्यांनी चारा छावण्या पुन्हा सुरु कराव्यात या प्रश्न बदल सभागृहात आवाज उठवला आणि आक्रमक पवित्रा घेतला आणि आज त्यांच्या मुळे गुरे व जनावरे जगतायत या वरून त्यांच प्राणिमात्रावरच विलक्षणीय प्रेम दिसून येत 
दुष्काळ प्रवन क्षेत्रात सत्ताधारी फक्त ए सी गाडीत बसून दोरे करत होते पण ते फक्त ओपचारिकता पूर्ण करत होते
पण धनंजय मुंडे हे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस च्या उन्हात शेतकऱ्याच्या बाधावर बसून बळीराज्याच्या परिस्थितीचा आढावा घेत राहिले आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम ते करत होते आणि वरील कामांची पोच पावती त्यांना जनतेनी आताच झालेल्या निवडणुका जि प व पंचायत समितीच्या मधे जनतेनी त्यांना डोक्यावर घेतलं आणि सर्वाधिक मताधिक्य राष्ट्वादि पार्टीला मिळाले  व मुंडे यांच्यावरील प्रेम मतांद्वारे दाखवून दिल सध्याच्या परळी मतदार संघातील सतेतील नेत्रत्वाल मोठा फटका त्यांनी दिला आणि धनंजय मुंडे हे या मतदार संघाचे खरे विकासाभिमुख आहेत बहे मताद्वारे दाखून दिले 
एकापेक्षा एक सरस कामांमुळे मुंडे यांच नेत्रत्व आता बीड जिल्ह्या पुरत राहील नसून व मराठवाड्या पुरत नसून या नेत्रवत्वाची व्याप्ती आख्या महाराष्ट्र् भर विस्तारित होत आहे 
नेत्रत्वाच्या विस्तरामुळे ओ बी सी चा महाराष्ट्रातील नवा चेहरा म्हणून मुंडे यांच्या कडे पाहिलं जात आहे पण मुंडे यांचा लढा फक्त ओ बी सी जनते पुरता नाही मुंडे यांचा लढा हा पुर्न जाती पातीन साठी आहे हे त्यांनी मराठा आरक्षण बदल सभागृहात आपला आवाज उंचावून पूर्ण महाराष्ट्राला त्यांनी दाखून दिल 
मंग ते धनगर समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल यांच्या आरशनाबदल व न्याया बदल मुंडे यांचा अविरत संघर्ष चालूच आहे. जो पर्यंत महाराष्ट्रातील समाजाना योग्य दिश्या व योग्य सन्मान मिळत नाही तो पर्यंत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्या शिवाय राहणार नाहीत यात शंका नाही..! 

- शाम के गित्ते ( संग्रहित लेख) 

मंगळवार, १८ जुलै, २०१७

सर्वसामान्यांशी नाळ जोडलेलं नेतृत्व

                     धनंजय मुंडे.. साधारण 10-15 वर्षांपूर्वी हे नाव महाराष्ट्रात उच्चरल्यावर लोकांमध्ये हा आमुक आमुक मोठ्या नेत्याचा पुतण्या बस एवढीच ओळख होती, ह्या उदयोन्मुख नेत्याला खरी ओळख भेटायला सुरुवात झाली 2012 सालीच्या बंडामुळे, महाराष्ट्रात जवळपास 40 वर्ष एक प्रकारे राजकारण गाजवून सोडणाऱ्या आणि प्रस्थापित असलेल्या गोपीनाथ मुंडें साहेबांविरोधात बंड करणे म्हणजे खूप मोठी घटना त्यावेळी मानली गेली , पण म्हणतात ना बंड करणे खूप सोप्पे पण ते यशस्वी करून दाखवणे खूप अवघड..!
                      2012 सालापासून आज पर्यंतची या उदयोन्मुख नेतृत्वाची वाटचाल म्हणजे ते बंड एकप्रकारे यशस्वीच होय, 2012 साली गोपीनाथ मुंडे साहेबांची साथ सोडल्यानंतर ह्या पोराचे काय खरे आहे , काकाच्या जीवावर आजपर्यंत चालले होते , ह्याचे राजकारण संपल्यात जमा इत्यादी, अगदी आह से लेकरं आह तक बऱ्याच चर्चा गावागावातील चावडीवर झाल्या , आणि याची सुरुवात झालीसुद्धा अशीच काही, महिन्याच्या अंतराने झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विरोधकांनी भावनेच्या आधाराने धनंजय मुंडेंना संबंध लोकांमध्ये एकप्रकारे खलनायक ठरवले, याचा परिणाम म्हणजे धनंजय मुंडेंना नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेत पूर्ण पणे पराभवाचा सामना करावा लागला , स्वतः पंडित अण्णा मुंडे यांना सुद्धा पराभव पाहावा लागला.
                     एखाद्या खलास्याने पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यासाठी आपली जहाज तयार करणे आणि ती तिच्या पहिल्याच सफरी मध्ये बुडणे असाच काहीसा प्रकार धनंजय मुंडेंच्या बंडाच्या बाबतीतही त्यावेळी झाला, अपुरा वेळ , संघटन बांधणीचा अभाव ह्याचा फटका धनंजय मुंडेंना त्यावेळी बसला ,पण खचून जातील ते धनंजय मुंडे कसले , लागलीच त्यांनी आपला स्वतःचा रस्ता स्वतः बनवायला सुरुवात केली, पक्षाचे मेळावे घेणे , गावोगावी जाऊन लोकांना सत्यपरिस्थीती सांगून मतपरिवर्तन करणे , आणि कार्यकर्त्यांची एक विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसवून एक नवीन सुरुवात करणे, ह्याचा एकत्रीत परिणाम 6 महिन्यांनी झालेल्या ग्रामपंचायात निवडणुकीत दिसून आला, ज्या परळी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये भाजप सोडून कोणताच पक्ष निवडून येऊ शकत नाही हा जर इतिहास असेल आणि धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी म्हणून जन्मगाव नाथरासाहित तालुक्यातील 80 टक्के ग्रामपंचायती जिंकून त्यावेळी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली..
                          लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला हमखास 50 हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देणाऱ्या परळी मतदारसंघाचे लीड सुद्धा 30 हजारांनी घटवून दाखविलं, 3 वर्षांपूर्वी च्या विधानसभा निवडणुकीत सत्तेबाबत असलेली एकूणच अँटी इंकंबन्सी , सत्ता बदल करण्याचा असलेलं एकूणच जनमानस , मोदी लाट , मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली सहानुभूती असूनही धनंजय मुंडेंना विधानसभा जिंकण्यासाठी 15 ते 20 हजार मते कमी पडली, म्हणतात ना सूर्य कधी तळ हाताने झाकत नाही तसंच काहीसे धनंजय मुंडेंच्या बाबतीत झालं , विधानसभा निवडणुकीत पराभव होऊन देखील धनंजय मुंडेंवर विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी पवार साहेबांसारख्या जोहरीने टाकली, विरोधी पक्षनेते पद मिळाल्यापासून धनंजय मुंडें मध्ये एकप्रकारे वेगळाच उत्साह संचारला गेला, आपली आक्रमक वक्तृत्वशैली , सत्ताधाऱ्यांवर तुटून पडायची हातोटी , भारदस्त शरिरयष्टी ,आणि त्या जोडीला राजकारणी आवाज ह्यामुळे भल्या भल्या मंत्र्यांना मुंडेंचा धाक वाटायला लागला, चिक्की घोटाळा प्रकरण असो कि बोगस डिग्री असो , कोपरडी येथील बलात्काराची घटना असो की शेतकऱ्यांची अडचण ,मुंडेंनी सरकारला असे काही अडचणीत आनले कि बस्स....!
                              सभागृहात त्यांचे भाषण सुरु झाले की सत्तेतील काही मंत्री सभागृहात येण्यास धजावतात इतकं स्पष्ट आणि पुराव्यासाहित ते एखाद्या प्रकरणाची चिरफाड करतात, आपले एखादे काम धनंजय मुंडेंकडे घेऊन गेल्यास ते या सरकारला वाकवू शकतात हि खात्री सर्वसामान्य जनतेला पटू लागली आणि मुंडेंच्या कार्यालयात ह्या जुलमी राज्य सरकार विरोधात गाऱ्हाणी मांडायला लोक येऊ लागली ,मुंडेंही त्या सर्वांच्या समस्या जातीने समजावून घेऊन स्वतःची समस्या असल्यासारखे त्यात लक्ष घालतात आणि ती मार्गी लावतात, अशाप्रकारे हे नेतृत्व हळू हळू संबंध महाराष्ट्रच्या जनतेच्या संपर्कात जात आहे , मुंडेंची खासियत म्हणजे त्यांचे वक्तृत्व होय, एखाद्या दगडाला देखील पाझर फुटेल इतके त्यांचे वक्तृत्व प्रभावशाली , कुठलीही निवडणूक असली की पक्षाचे उमेदवार आम्हाला धनंजय मुंडेंची सभा द्या असा आग्रह करतात आणि मुंडे त्यांच्या मदतीसाठी जातातही , कुठलाही नेत्याला राज्याचे नेतृत्व करत असताना स्वतःच मतदारसंघ सांभाळायची तारेवरची कसरत करावी लागते , त्यातही मुंडे तरबेज निघाले ह्याचा पुरावा म्हणजे मागच्या 8 महिन्यातील परळी मधील 4 निवडणूका होय , नगरपालिका असो की पंचायत समिती , किंवा जिल्हा परिषद असो की बाजार समिती धनंजय मुंडेंचा वारू चौफेर उधळला गेला, विरोधातील नेतृत्व राज्याच्या मंत्री मंडळात तब्बल 4 खात्याचा मंत्री असताना देखील परळीकर जनतेने विरोधी पक्षातील एका नेत्याच्या पारड्यात आपला कौल द्यावा हा म्हणजे त्यांचा आपल्या लाडक्या नेतृत्वावरील विश्वास होय.....!
प्रतिष्ठित राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात जन्म होऊन देखील धनंजय मुंडेंना काही वशिलेबाजी ने मिळाले नाही , ते त्यांनी मिळवले स्वकर्तृत्वानेच...!
                        म्हणतात ना जर तुमच्यात दम असेल कर्तृत्व असेल आणि तुमची नाळ सर्वसामान्य जनतेशी जुळलेली असेल तर राजकारणात तुम्हाला मोठं होण्यापासून कोणी रोखू शकत नाही हे धनंजय मुंडेंकडे पाहिल्यास समजते.
           
 - आदित्य मुंडे ( संग्रहित लेख )

मला समजलेले धनूभाऊ



"धनंजय पंडितराव मुंडे "हे नाव मला 2002 ला कळलं त्यावर्षी च पहिली भेट आणि ओळख झाली तेव्हा मी फक्त 15 वर्षे वयाचा असेल ज्या दिवशी ओळख झाली तो दिवस म्हणजे ज्या दिवशी धनुभाऊच्या राजकीय आयुष्याची सुरुवात झाली ते पहिली निवडणूक जिंकले होते घरचा हक्काचा विजयाची हमी असलेला गाढेपिंपळगाव हा मतदारसंघ सोडून एकदम अडचणी चा आणि अवघड अश्या (उजनी जी प गटातून)अटीतटीच्या लढतीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाले होते. सुरुवातीपासूनच या माणसाला प्रवाहाच्या विरोधात जाऊन संघर्ष करून आपलं अस्तिव निर्माण करण्याची जिद्द होती.. म्हणतात ना "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" ते त्यावेळीच दिसलं होत
मला क्रिकेट ची खूप आवड होती आणि धनुभाऊ ना पण.. त्यांच्यासारख क्रीडाप्रेमी नेत्रत्व होत म्हणून तर त्यांच्या माध्यमातून परळी सारख्या ग्रामीण भागातून बऱ्याच क्रिकेटपटूनी राज्यपातळीवर परळीच नाव गाजवलं.. त्यांचा स्वामी विवेकानंद क्रिडा प्रसारक मंडळ आताचे (नाथ प्रतिष्ठान) क्रिकेट क्लब होता याच क्रीडा मंडळाने 1995 पासून स्व मुंडे साहेबांच्या  वाढदिवसानिमित्त दरवर्षी देशपातळीवरील क्रिकेट स्पर्धा आयोजित करून परळी सारख्या ग्रामीण भागातील क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना वर्षनुवर्षं जणू क्रीडा मेजवानीच दिली कपिल देव,मो.आझरुद्दीन, रॉबिन सिंग,नयन मोंगिया, सलील अकोला,लक्ष्मीकांत बेर्डे या बड्या हस्ती नां परळीत धनुभाऊनी क्लब च्या माध्यमातून समस्त परळीकरांच्या भेटीला आणल..
मी 2002 ला तो क्लब ज्वाईन केला आणि नंतर त्यांच्या जणू धनुभाऊंच्या मित्र परिवारातील सदस्यच झालो..!

राजकीय प्रगल्भता आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणाऱ्या धनुभाऊं नि त्याच वयात आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली याच धर्तीवर नाथ प्रतिष्टान च्या माध्यमातून धनुभाऊं नि परळी मतदारसंघातील गोरगरीब सामान्य कुटुंबातील बहिणींचे लग्न (सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा) दरवर्षी लावून द्यायचा महायज्ञ पेटवला तो आजही पेटलेलाच आहे. आजही प्रत्येक वर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात कधी 150 तर कधी 200 असे विवाह धनुभाऊं लावून देतात..!
हळूहळू हे युवा नेत्रत्व जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्रच्या राजकारणात आपली वेगळी छाप वेगळा ठसा उमटवत होत 2006 ला तत्कालीन भाजप श्रेष्ठीना या वाघाच्या छाव्या ची दखल घ्यावी लागली आणि भा. ज. युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी धनुभाऊ ची निवड झाली
तो पर्यंत मी पण त्यांचा कार्यकर्ता आणि सहकारी बनलो होतो गर्व आणि अभिमान वाटायचा भाऊंचा कार्यकर्ता म्हणलं की... तशी ओळख, तसा दरारा, तशी छाप, तसा रुबाब,  तसा वक्ता, तसा धाडसी रुबाबदार, अतिशय मायाळू, कार्यकर्त्यांना जीव लावणारा नेता लाभायला पण नशीब लागत. कोणत्याही कार्यकर्त्याला धनुभाऊ नि कार्यकर्ता म्हणून वागविले नाही तर लहान मोठा भाऊ म्हणूनच वागणूक दिलीय.
2007 ला परत( पट्टीवडगाव गट) जी प ची अटीतटीची निवडणूक अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप मोठ्या फरकाने धनुभाऊ जिंकले आणि बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेच्या सिंहासनावर बसले..!

उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात जिल्हाभर अगणित विकासकामे केली त्यामुळे जिल्ह्यात त्यांना मानणारी तरुण आणि प्रौढ कार्यकर्त्यांची फळी आपोआपच तयार होत गेली आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली.! गोरगरीब, दिन दलित, गरजू लोकांच्या अडीअडचणी जिकिरी ने आणि प्रथम प्रधान्य देऊन तळमळीने सोडवण्याची वेगळीच हातोटी आणि सर्वसामान्यां साठीची धडपड ह्या जनतेच्या मनाला भावून जाणाऱ्या गोष्टी त्याच वेळी सांगत होत्या की हा माणूस केवळ इथंच थांबणारा नाही किंवा एका जिल्ह्यापुरता मर्यादित नाही उद्याच महाराष्ट्राच उज्वल भविष्य आहे..!
पुढं चालून धनुभाऊ च्या कार्याचा आलेख वाढत गेला आणि धनुभाऊ भा.ज.यु.मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष झाले आणि आजचे मुख्यमंत्री फडणवीस त्याच युवा मोर्च्या च्या बॉडीमध्ये सरचिटणीस पदी होते त्यावेळी धनुभाऊंनी फडणवीस साहेबांच पण नेत्रत्व केलं आहे..!

आजच्या पंतप्रधान मोदी साहेबांना पहिल्यांदा महाराष्ट्र्रात जर कोणी आणले असेल तर ते पुण्यात 2008 ला भव्यदिव्य कार्यकर्ता मेळाव्याच्या सभेचा कार्यक्रम आयोजित करणारे वाघ धनुभाऊ..

धनंजय मुंडे साहेबांच्या संघर्ष शील कार्याचा पाडा आणि त्यांची जीवणगाथा एका लेखात लिहिताच येत नाही.

- नंदकिशोर मुंडे ( संग्रहित लेख )

ना.धनंजय मुंडे..ग्रामीण राजकारणाची नाडी जाणनारा चेहरा

ना.धनंजय मुंडे ग्रामीण राजकारणाची नाडी जाणनारा चेहरा..

महाभारता मध्ये अर्जुना चा दुसर नाव ;धनंजय; हे नावच बरच काही सांगून जाता .नावातच ;धन आणि जय आसलेल्या या महाराष्टाच्या नव्या चेहऱ्या कडे पहिले जाते. आपल्या नावतल्या ;धन; या शब्दाला तो जनता रूपी धन समजतो .तर जय,, या शब्द विजय नसून ते आहै जय रुपी कर्तुत्व .आज पाहिलं गेलं तर त्या विधानपरिषेदेच्या च्या रेड कार्पेट वरच्या बाकावर घुमनारा विरोधी आवाज म्हणजे धनंजय मुंडे . जि. प. पासून काकांच्या राजकीय गुणांचे रिव्हिजन करत प्रवास सुरु झाला. ग्रामीण भागातील जनते चे प्रश्न कशे सोडवावेत याची नाडी जाणणारा हा विश्लेषनिया भाषण शैली , हजरजबाबी , अभ्यासू वेक्तिमत्व असलेला नेता. राजकारणातील कुबेर असलेले शरदचंद्र जी पवार साहेब यांचे तोंडून जर एखादा प्रतिभा शाली युवा विरोधीपक्ष नेता होत असेल तर तो तसा हुशार आणि नशीबवान असायला हवा. आज बघितलं गेलं तर परिषदे मध्ये
वेगवेगळ्या मुद्दे हातात घेऊवून सरकार ला धारे वर धरत त्या वर अभ्यासू भाषण देऊन त्याचा जनते साठी महत्व किती आहै हे अशे मुद्दे त्यानी गाजवलेले अहैत. मंग ते कोपार्डी प्रकरना तील आरोपीचा मुदा असो ,नाही तर तो मराठा आरक्षण असो.अश्याच प्रकारे संगणक परीचालक चा मुदा असो . किंवा त्या शेतकरी कर्ज माफी मधील खारी चा वाटा .आश्या प्रकारच्या मुद्या साठी त्याना ओळखला जाता. धनंजय मुंडे यांचा प्रवास ग्रामीण ते शहरी आहे. त्या मुळे ग्रामीण भागातील जनते चे प्रश्न कश्या प्रकारची आहेत हे त्याना चांगलंच माहित आहै. म्हणून महाराष्टाच्या राजकारणातील नवा चेहरा म्हणून त्यान्च्या कडे अशे ने पाहिला जाता आज धनंजय मुंडे हे केवळ जिल्ह्या पुरता नेतृत्व राहिलेला नसून ते एका महाराष्ट्राचा युवक आदर्श नेतृत्व बनलं आहे. भविष्यात हे नेतृत्व महाराष्टाच्या शीर पेचात तुरा रवल्या शिवाय राहणार नाही..हे तीतकेच खरे राहील..!

- शाम के गित्ते व राम के गित्ते यांचे दोन संग्रहित लेख

"जैसे सुख दुःख आपुले देही,तैसेचि सर्वांभूती पाही!" धनं-विजय



आजच्या महाराष्ट्राला धनंजय मुंडे हे नाव श्रुत आहे, पण काका पुतणे असे राजकीय समीकरण असलेल्या पुरोगामी महाराष्ट्राला साधारण 15 ते 20 वर्षांपूर्वी धनंजय म्हणजे स्व. गोपीनाथ मुंडे यांचा पुतण्या एवढीच ओळख होती, पण खरंच असं होतं का ? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी परळी म्हणजे पूर्वीच्या रेणापूर मतदारसंघाचा इतिहास उखडून बघावा लागेल.1991-92 ला पहिल्यांदा स्व.मुंडे साहेब राज्याचे विरोधी पक्षनेते झाल्यापासून म्हणजे धनंजय यांच्या अगदी नवतारुण्यापासून थेट जनतेशी जोडले गेले. स्व.मुंडे साहेब राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आणि स्थानिक जबाबदाऱ्या पर्यायाने स्व. पंडित अण्णा व नवतरुण धनंजय यांच्यावर आल्या. त्यानंतर स्व. मुंडे साहेबाना स्वतःच्या मतदार संघात मागे वळून पहायची वेळ क्वचितच आली असेल! हळू हळू वडील व चुलते या दोन मातब्बर राजकारण्यांच्या शाळेतला धनंजय हा विद्यार्थी राजकारणाचे धडे गिरवत गेला!

सार्वजनिक काम असो,सामाजिक अडी-अडचणी असोत,किंवा कोणाचे वैयक्तिक काही काम असो, धनंजय कडे गेलेला माणूस कधीच निराश ओरतला नाही, हे आजही अभिमानाने सांगता येईल.

जसजसे हे युवा नेतृत्व बहरत गेले तसतसे धनंजय यांचा चाहता वर्ग वाढत गेला, सोबतच काही स्वार्थी व विघनसंतोषी लोकांच्या डोळ्यात खुपत गेला. पुढे बीड जिल्हा परिषदेमध्ये सत्तेसाठी झालेल्या घडामोडी असतील किंवा विधानसभा-लोकसभा निवडणुकीतले जय-पराजय असतील, धनंजय यांनी सगळ्या परिस्थितीला मात देताना जी राजकीय पतीपक्वता दाखवली त्यातूनच भाजपा नेतृत्वाने युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष पदाची सूत्रे धनंजय यांच्या ताब्यात दिली! नरेंद्र मोदी यांची त्या कालची पुणे येथील महासभा ही या निवडीला सार्थ ठरवून ह्या युवा नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारी ठरली. तिथूनच खऱ्या धनंजय पर्वाची नांदी झाली म्हणावे लागेल! पण नियतीला व त्यांच्या राजकीय शत्रूंना कदाचित हे मान्य नसावं, म्हणूनच 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज भरायच्या दिवशी माघार घ्यावी लागली, पण तरीही धनंजय यांनी पक्षधर्म व कुटुंबधर्म सांभाळत मोठ्या मनाने लहान बहिणीचा प्रचार केला, निवडूनसुद्धा आणल!

पुढे मुंडे कुटुंबात झालेले सर्व विषय संबंध महाराष्ट्राने पाहिले. शेवटी स्वतःचे अस्तित्व आणि कर्तृत्व सिद्ध करायला एकटाच घराबाहेर पडलेला हाच धनंजय आज नामदार धनंजय मुंडे झालेला संबंध महाराष्ट्राने पाहिला!

काकांशी गद्दारी केली,बहिणीचा विरोध करण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याना मुद्दाम मोठं पद दिलं, असे अनेक आरोप धनंजयवर झाले, काही लोक सोशल मीडियावर आजही त्या चर्चा रंगवतात. परंतु अविरत संघर्ष,जनतेशी थेट जोडलेले ऋणानुबंध,असा हजारो किलोमीटर चा प्रवास करत असताना धनंजय यांनी आपले संघटन कौशल्य, मतदारसंघावर तयार केलेली मजबूत पकड आणि आपली जबरदस्त भाषण शैली यांच्या जोरावर ह्या सर्व चर्चा फोल ठरवल्या! आपल्या अभ्यासू, निर्भीड भाषणातून त्यांनी विरोधी पक्षनेता कसा असावा याचे एक उत्कृष्ट उदाहरण प्रस्थापित केले.

काही जातीयवादी संघटना संकुचित विचार मनात ठेवून सोशल मीडिया सारख्या माध्यमांमध्ये धनंजय यांच्यावर सातत्याने व हेतुपुरस्सर टीका करून समाजासमोर खलनायक अशी प्रतिमा तयार करायचा केविलवाणा प्रयत्न करतात, काहींनी तर राजकीय व कौटुंबिक मिश्रण तयार करून भावणीकतेचा आधार घेत धनंजय यांना परळीच्या कुरुक्षेत्रांतले कौरव ठरवायचा प्रयत्न देखील केला. पण एकंदरीत पूर्ण माहिती घेऊन सत्य स्वीकारून उदाहरणे व्यवस्थित तपासून पाहिली तरच खरं सत्य लक्षात येईल. धनंजय हे आज राजकीय धुरंदर समजल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत, एवढेच नव्हे तर सत्ताधारी पक्षात सुद्धा त्यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त मान सन्मान आहे, याची प्रचिती मंत्रायलायत गेल्यावर येते! टीकाकारांनी याची सत्यता मात्र अवश्य पडताळून पहावी. राजकीय मतभेद कौटुंबिक कलह आणि वैयक्तिक द्वेष यातला फरक समजायला समाजसपणाच नव्हे तर तेवढी परिपक्वता पण लागते ! विविध दुःखद प्रसंगामुळे सलग तीन वर्षे वाढदिवस साजरा न करणे, वाढदीवसाला हार तुरे न स्वीकारणे यातून धनंजय यांची नैतिकताच नव्हे तर मनाचा मोठेपणा पण दिसून येतो.

म्हणूनच सरते शेवटी एवढंच सांगावस वाटतं की धनंजय मुंडे हे राज्य व बीड जिल्ह्यातील राजकारणातले भीष्म जरी ठरले असले तरी कौटुंबीक व परळीच्या कुरुक्षेत्रात मात्र धर्मवीर युधिष्ठिराच्या भूमिकेत आहेत व शेवटपर्यंत राहतील! तसे लिहायला अजून बरेच काही आहे पण आज वाढदिवसानिमित्त परळीच्या या धर्मवीर युधिष्ठिरास अभिष्टचिंतन व शतशः नमन!

- सुधीर सांगळे ( संग्रहित लेख )